Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

तुमच्या साडीवर खुलून दिसणारे झुमके

 

झुमका हा प्रत्येक स्त्रीला आवडत असतो एखाद्यावेळी तिला कॉलेजला असताना आणि लग्नाअगोदर आवडणार नाही. पण साडीवर तो तितकाच उठून दिसत असतो. आणि रंगबेरंगी साडी असेल तर बघायलाच नको. आणि आता सध्या बाजारात खूप विविध प्रकारचे झुमके दिसून येतात. अगोदर बॉलिवूडच्या हिरोईन व स्वतःला खूप काही समजणाऱ्या स्त्रिया ह्या झुमक्यांना ओल्ड जुनी फॅशन मानायच्या पण आता झुमक्याचे दिवस भरभरून आले आहेत. तेव्हा हा ब्लॉग त्यासाठी.

साडीवर किंवा ड्रेसवर शोभून दिसेल असा कळीदार झुमका सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा झुमका वजनाला जरी जास्त असला तरी घातल्यावर क्लासी लूक देतो.

बॉलिवूडमधल्या नट्यांच्या सौंदर्यात भर घालणारे झुमके आजही तितक्याच ट्रेंडमध्ये आहेत. विशेष म्हणजे या झुमक्यांना जगभरातून मागणी येताना दिसतेय. चांदीचे झुमके परदेशात मागवले जात आहेत. चंदेरी आणि सोनेरी अशा दोन्ही रंगांतले झुमके सध्या बाजारात आले असून, त्यांना तरुणींकडून पसंती मिळतेय.

साडीवर किंवा ड्रेसवर शोभून दिसेल असा कळीदार झुमका सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा झुमका वजनाला जरी जास्त असला तरी घातल्यावर क्लासी लूक देतो. पण हा झुमका फक्त पारंपरिक लूकसाठी न घालता आता वेस्टर्नवरही घालू शकता. ट्रॅडीशनल प्लस वेस्टर्न झुमका बोहो स्टाइलमध्ये शोभून दिसतो.ऑक्सिडाइज्ड झुमके हे नेहमीच दिसायला सुंदर दिसतात. परदेशातही या झुमक्यांना भरपूर मागणी असते. भरीव छोटे रंगीत मोती आणि नक्षी केलेले झुमके हे सगळ्यांच्याच पसंतीस पडतात.

झुमक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे लांबलचक झुमके घातल्यानंतर इतर कोणतेही दागिने घालण्याची गरज पडत नाही. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये रेखा, विद्या बालन आणि आणखी काही बड्या अभिनेत्री चंदेरी साडी आणि त्यावर झुमका घालत पारंपरिक लूकमध्ये रेड कार्पेट गाजवतात. झुमका म्हंटला की त्याला बऱ्याच वेळा ओल्ड फॅशनचा टॅग लावण्यात येतो. पण या पारंपरिक झुमक्यांना परदेशातही इतकी मागणी आलीय की राजस्थान, जयपूरमधल्या बाजारपेठांमध्ये त्याला खूप भाव आहे.

अस्सल चांदीचे झुमके तर सगळ्यांनाच हवेहवेसे वाटू लागले आहेत. सध्या झुमके हे खूप पारंपरिक डिझाइन्समध्ये मिळू लागलेत. गणपती, मयूर, पीस, कोयरी या डिझाइन्सना खूप मागणी आहे. बारीक नक्षी आणि पारंपरिकता यामुळे झुमका प्रसिद्ध होऊ लागला आहे. घुंगरू लावलेले झुमके हे तर सगळ्यांच्या आवडीचे ठरतात. झुमक्याच्या आकारांमध्येही अनेक प्रकार आढळतात. ज्वेलरी एक्सपर्टसच्या मते, तुमच्या चेहऱ्याच्या आकाराला शोभून दिसेल अशा आकारातले झुमके घाला. १ इंचापासून ४ इंचापर्यंतच्या आकाराचे झुमके मिळतात. साधारण ५० रुपयांपासून झुमक्यांची किंमत सुरू होते.

   साभार - प्राची आंधळकर

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon