Link copied!
Sign in / Sign up
28
Shares

तुमच्या बाळाचे पोट ह्या चुकीच्या सवयीने भरत नाही ना ?

          तुमच्या तान्ह्याला तुम्ही कसे जेवू घालता कारण बऱ्याचवेळी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बाळाला खाऊ घालत असाल तर बाळ जास्त जेवण करत नाही. आणि खुप मातांची समस्या असते की, बाळाचे वजन वाढत नाही. तो खात नाही. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला बाळाला काही वेळेस चुकीच्या पद्दतीने खाऊ घालण्याने काय समस्या येऊ शकतात त्याविषयी.

१) जंक फूड खायला देणे

तुम्ही चॉकलेट, गोळ्या लहान मुलांना एखाद कार्य पूर्ण केलं तर देता का? असे केल्याने मुलांची जंक फूड खाण्याची आवड निर्माण होते. मुले पोषक अन्न खाण्याचा कंटाळा करतात. व पौष्टीक अन्न खाणे बंद करतात. कारण दर वेळी त्यांना बक्षीस किंवा मोबदला म्हणून मिळणाऱ्या जंक फूड ने त्यांना एकप्रकारचे समाधान मिळते.

२) ताटात असलेलं सगळं अन्न संपवायचा आग्रह करणे

जर तुमच्यासमोर भरलेले ताट असेल, त्यातील अर्धे अन्नपदार्थ खाऊन तुमचे पोट भरत असेल आणि तरीही जर तुमच्या बाजूला बसून कोणी तुम्हाला आग्रह करत असेल त्यावेळी तुम्हाला काय वाटेल तसेच तुमच्या मुलांना वाटत असते. प्रत्येकाची खाण्याची ठरावीक क्षमता असते. मुलांना जबरदस्ती केली तर जेवणाच्या वेळांची त्यांना भीती बसते. व जेवणाच्या वेळा त्यांना आवडेनाशा होतात.

३) मुलांचे एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लक्ष वळवून त्यांना जेवण भरविणे

बऱ्याच वेळी पालकांकडून अश्या पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे मुले जेवणाचा आनंद घेऊ शकत नाहीत. व काही वेळा जेवणासाठी त्रास देतात. लहान वयात मुलांनी जेवणाचा आनंद घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांची जेवणाची सवय वाढत जाते. जेवायला देताना मुलांना काही ना काही वेगवेगळे पदार्थ देण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून बरेच पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातील.

४) इतर पालकांच्या आपल्या मुलाच्या खाण्याच्या सवयी तुमच्या मुलासाठी लागू करू नका

प्रत्येक मुल वेगळं आहे म्हणूनच त्यांच्या खाण्याच्या सवयी सुद्धा वेगवेगळ्या आहेत. आपल्या मैत्रिणीच्या मुलाला काही पदार्थ आवडतात तेच तुमच्याही मुलाला आवडतील असे नाही. त्यामुळे तसे करू नका. मुलांना वेगवगेळे पदार्थ खाऊ घाला आपोआपच त्यांना त्यांच्या आवडीनिवडी समजतील.

५) मधल्या वेळच्या खाण्यात पदार्थ खाऊ घालणे

मधल्या वेळच्या खाण्यात मुलांना कोणतेही पदार्थ खाण्याची परवानगी देणे चुकीचे आहे. लहान मुलांना पौष्टिक पदार्थांपेक्षा जंक फूड जास्त आवडते. त्यामुळे आपसूकच ते जंक फूड खाऊन पोट भारतात. पालकांनी मुलांच्या मधल्या वेळच्या खाण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना फळे किंवा भाज्या असलेले पौष्टिक अन्न त्यावेळी खाऊ घातले पाहिजे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon