Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

तुमची त्वचा कोरडी झाली आहे ना ! तर ह्या सोप्या घरगुती गोष्टी करा


हिवाळ्यात आणि सर्दी झाल्यावर त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेचे तेज कमी होते. आणि कोरडी त्वचा झाल्यावर ती हिवाळ्यात खूपच खराब दिसत असते. तेव्हा दररोज चेहऱ्याला दुधातून काही पदार्थ मिसळून लावले तर त्वचा चमकदार व्हायला मदत होते. आणि त्वचा दुधासारखी नितळ आणि शुद्ध होते. त्यासाठी कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत ते आम्ही ह्या ब्लॉगमधून सांगणार आहोत.

* २ चमचे दुधाची साय आणि २ चमचे मध यांचे मिश्रण चेहऱ्याला अर्धा तास लावून ठेवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. त्वचा मुलायम होऊन चमकदार दिसेल.

* ४ चमचे दुधात १ चमचा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावरील डाग नष्ट होतील. चेहरा उजळ होईल.

* १ चमचा दुधाच्या सायीत अर्धा चमचा हळद मिसळून चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासाने पाण्याने चेहरा धुवा. 

* दूध आणि गुलाबपाणी २-२ चमचे घेऊन व्यवस्थित मिसळा. चेहऱ्याला २० मिनिटे लावून ठेवा. हा उपाय रोज केल्याने चेहरा तुकतुकीत व्हायला मदत होईल.

* ४ चमचे दुधात अर्ध केळं कुस्करून चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन ग्लो वाढायला मदत होईल.

* जमलेस तर दररोज रात्री ५ चमचे दुधात २ किंवा ३ काजू भिजत ठेवा. सकाळी भिजवलेले काजू दुधात वाटून अर्धा तास चेहऱ्याला लावा. यामुळे सुरकुत्या कमी होऊन चेहरा उठावदार दिसेल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon