Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

वृंदावनातील तुळशीचे आरोग्यदायी माहित नसलेले फायदे…. ..


तुळस भारतातल्या प्रत्येक घरात पुजली जाते. आणि घरासमोर वृदांवन आणि त्यावर तुळस. खूप छान दिसते आणि सोबत ह्यामुळे घराची भरभराट सुद्धा होत असते. तुळशीचे महत्व आणि फायदे कोणत्याच स्त्रीला सांगण्याची गरज नाहीये कारण तिला त्याविषयी लहानपणापासून माहित असते. पण असे कितीतरी फायदे आणि महत्व आहे ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

१) तुळशीमुळे रोग - प्रतिकार शक्ती वाढते

तुम्हाला वातावरण बदलामुळे लगेच सर्दी आणि खोकला होतो. आणि बाहेरचे पाणी पिल्यावर लगेच त्रासही व्हायला लागतो. तर तुळशीमध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडेन्ट हे गुण असतात ह्यामुळे फ्ल्यू, खोकला, सर्दी, आणि हवेतून पसरणारे आजार होत नाहीत.

काय उपाय करावा :

तुम्ही ह्यासाठी तुळशीचे पान ही ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवायची. तुम्ही हे तुळसीयुक्त पाणी दिवसभर मध्ये मध्ये पिऊ शकता. आणि वाटल्यास हे पाणी रात्रभर ठेवून सकाळी उठल्यावर न चुकता दररोज पिल्यास तुम्हाला खोकला कधीच येणार नाही. आणि तब्येतही बिघडणार नाही.

२) तुमचे हृदय मजबूत होते

तुलसी खाण्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते. शुद्ध रक्त हृदयाला मिळाल्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम होते. त्यासाठी काय करायचे तर सकाळी उठल्यावर तुळशीचे पाने स्वच्छ धुवून खायची.

३) यकृताला सदृढ बनविते

खूप औषधे घेतल्याने, कमी प्रतीचे खाल्ल्याने, आणि दारू पिल्यामुळे तुमच्या यकृतावर (लिव्हर) वर दबाव पडून खराब होऊन जाते. तेव्हा त्यासाठी तुम्ही जर तुळशीची चहा घेतली तर यकृत खूप चांगले होऊन जाते. आणि तुमच्या शरीरातील विषारी घटकही कमी करून देते. ह्यासाठी, सकाळी चहा बनवतो तितक्या गरम पाण्यात तुळशीचे पण टाकून त्या द्रावणाला उकळून घ्यावे. ह्यात थोडी चिमूटभर हळद टाकावी. आणि त्यानंतर ते द्रावण पिऊ शकता. किंवा त्यात साखर टाकून चहा बनवू शकता. किंवा जर तुम्हाला बाजारातून सुद्धा तुळशी चे उत्पादन मिळून जातील. आता तुळशीची चहा म्हणून सुद्धा उत्पादन निघाली आहेत.

४) डायबेटीस होण्याचे चान्स कमी होतात

आपल्याकडे खूप पेशंट डायबेटिसचे आहेत आणि खूप होणार आहेत तेव्हा त्यासाठी जर तुम्ही अगोदरच ह्याविषयी खबरदारी घेतलीच तर तुम्हाला डायबेटीस होणार नाही आणि झाला असेल तर तुम्ही त्यामधून काही प्रमाणात तरी आराम मिळवणार. ह्यामुळे eugenol, methyl eugenol, ह्यामुळे तुमच्या पेशी ह्या इन्सुलिन ची सेनिसिटीव्हिटी वाढवतात. त्यासाठी दररोज एक चमचा तुळशीचा ज्यूस घ्यायचा. पण ते उपाशी पोटी घ्यावे. आणि सकाळी तुळशीचे पाने खावीत.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon