Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

तुमचे वाढते वजन : एक निरर्थक चिंता. . .

वरच्या चित्रात  तुम्हाला किरण खेर चे वजन वाढलेले दिसतेय तरीही ती छानच दिसतेय तशीच सोनाक्षी सिन्हा ती तर झिरो फिगरला महत्वच देत नाही. आपले वजन, कपडे आणि एकूणच दिसणे या बद्दल आपण खूपच जागरूक असतो नाही का, आणि जगातील सर्वच स्त्रिया स्वतःच्या शरीराचा आकार, ठेवण या बाबत नको इतक्या भिडस्त आणि अवघडलेल्या मनःस्थितीत असतात कारण आपल्या समाजात स्त्रियांच्या शारीरिक वजन आणि ठराविक आकार या बाबत खूपच  संकुचित मनोवृत्ती  आहे.

सौंदर्याचे असे ठोकताळे आणि वर्गीकरण करणे खरेच खूप शरमेची बाब म्हणावी लागेल. एखाद्याच्या वजनावरून त्याची अवहेलना करण्याचे एक कारण म्हणजे आपल्यावर लादल्या गेलेल्या अशा समजुती आणि चुकीच्या धारणा ज्यामुळे आपण नकळत या मानसिकतेचा स्वीकार करतो.

सध्याच्या काळात तर रंग,उंची,वजन आणि लिंग यांवर आधारित टीका आणि भेद यांचे निकष बोथटपणाच्या कळसावर आहेत असेच म्हणावे लागेल. एखाद्याच्या रंगरूपावरून केली जाणारी कुजबूज काही काळानंतर अशा ताशेऱ्यांची, टोमण्यांची आरोळी बनते आणि याला बळी पडणाऱ्यांच्या मानसिकतेवर खोल आघात करते.

इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याची चिंता हेच आपल्या वजन कमी किंवा वाढण्याच्या काळजीचे मुख्य कारण असते. तुमच्या किशोरवयातील ते दिवस आठवून पहा. जे नैसर्गिक सौंदर्य जन्मतः मिळाले आहे त्यात समाधान मानण्यापेक्षा इतरांवर छाप पाडण्याची धडपड त्या वयात असते.

    सौंदर्याची आणि शारीरिक ठेवणीची काटेकोर ठोकताळे आणि अवास्तव  मापदंड ठरवणारे आसपासचे लोक,मित्रपरिवार,प्रसिद्ध व्यक्ती (सेलिब्रेटी ) आणि अगदी तुमचे स्वतःचे कुटूंबीय सुद्धा असतात

केवळ तुमचे आरोग्य हीच वजनाशी निगडित तुमची चिंता असायला हवी, इतर लोक म्हणतात त्याकडे बिलकुल लक्ष द्यायचे नाही. काही मोजक्या लोकांच्या असंवेदनशील टीकेला महत्व देऊ नका कारण तुम्ही जश्या आहात तसेच तुमचा खुल्या मनाने स्विकार करणारे पुष्कळ लोक आसपास आहेत. याबाबतीत ‘वजनदार’ नावाचा मराठी चित्रपट आला होता. 

काही अशा व्यक्तींचे अनूभव बघूया ज्यांना त्यांच्या शारीरिक ठेवणीमुळे टीकेचा सामना करावा लागला.

१) ''माझ्या आयुष्यात मला बेढब म्हणणारी व्यक्ती फक्त माझी आई होती, इतर कुणीच असे म्हटले नाही''.

२) ''महिलां इतकाच कदाचित जास्त, पुरुषांनाही शारीरिक ताशेऱ्यांचा अनुभव येतो''.

३) ''माझे ओठ भरीव नाहीत, शरीर सुडौल नाही आणि माझी त्वचाही नितळ नाहीये, जशी एका सुंदर स्त्रीची असायला हवी असते. मी सुंदर नाही याची मला लाज वाटते आणि मी कधीच स्वतःवर प्रेम करू शकत नाही''. 

वरच्या चित्रात तुम्हाला किरण खेर चे वजन वाढलेले दिसतेय तरीही ती छानच दिसतेय तशीच सोनाक्षी सिन्हा ती तर झिरो फिगरला महत्वच देत नाही.

४)  ''एखाद्या व्यक्तीचा आकार कसाही असो, शारीरिक ठेवणीमुळे टोमणे मारणे चूक आहे. कुठल्या तरी आजारामुळे शरीर बेडौल किंवा जास्त जाड असू शकते हे लक्षात घ्या''. आणि जाड असणे काही चुकीचे नाहीच उलट प्राचीनकाळी अशाच व्यक्ती असायच्या पण त्यावेळी कष्टाची कामे असायची. आता कष्टाची कामे खूप कमी झाली आहेत. फक्त आरोग्यसाठी या वाढलेल्या वजनाचा त्रास होईल हीच गोष्ट लक्षात घ्या. त्याबद्दलच काळजी वाटू द्या. आणि प्रयत्न करा कमी करण्यासाठी.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon