Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

गरोदरपणतील दुसऱ्या त्रैमासिकात स्त्रियांमध्ये होणारे आश्चर्यकारक बदल

गरोदरपणाचे दुसरे त्रैमासिक बरेचसे आनंददायी असते. धोकादायक असणारे पहिले ३ महिने मातांनी यशस्वीरीत्या पार केलेले असतात. या त्रैमासिकात घेतल्या जाणाऱ्या आहारामुळे त्याला गरोदरपणाचा ‘मधु-चंद्रचा म्हणजेच आनंददायी काळ म्हटले जाते कारण सुरवातीची मळमळ, उलट्या, थकवा आता जाणवत नाही.किंवा प्रमाण बरेच कमी झालेले असते. अनिच्छा ,कंटाळा हे या काळात कमी झालेले असते

तसेच दुसरे त्रैमासिक हा एक महत्वाचा काळ असतो. हा काळ बाळाच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा मानण्यात येतो हा टप्पा साधारणतः १४ व्या आठवड्या पासून २७ व्या आठवड्या पर्यंत असतो. तसेच या काळात तुमचे पोट बऱ्यापैकी दिसायला लागते. गर्भारपणात चेहऱयावर येणारी चमक दिसायला लागलेली असते. या त्रैमासिकात बाळाच्या महत्वाच्या अवयवाची वाढ होत असते. तसेच या काळात अनेक चढ-उतार असतात. तसेच बहुतांश स्त्रियांमध्ये या काळात अनेक आश्चर्यकारक बदल होतात

१. पहिल्या तीन महिन्यातील त्रासाचे प्रमाण कमी होते.

सुरवातीची तीन महिन्यातील मळमळ, उलट्या, थकवा आता जाणवत नाही.किंवा प्रमाण बरेच कमी झालेले असते. अनिच्छा ,कंटाळा हे या काळात कमी झालेले असते. त्यामुळे हे त्रैमासिक स्त्रियांसाठी थोडे निवांत असते.

२.बाळाची हालचाल जाणवायला लागते.

जर आपण भाग्यवान असाल, तर आपण तुम्हांला १४ व्या आठवड्यात बाळाला हालचाल जाणवायला लागू शकतात. ही पहिले काही क्षण पोटात गुदगुल्या झाल्यासारखे वाटणारे असतात. २० व्या आठवड्यात, बाळाच्या हालचाली ठळकपणे जाणवायला लागतात. कदाचित तुम्हांला बाळाच्या लाथा जाणवू लागतील. हे तुमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आणि आनंद देणारे असेल.

३. चेहरा तजेलदार आणि प्रसन्न दिसू लागेल.

गरोदर स्त्रियांच्या चेहऱ्यावर या काळात येणारा तजेला आणि प्रसन्नता आसपासच्या लोकांना देखील प्रसन्न करते. हे काम संप्रेरकाच्या बदलांमुळे घडत असते.

४. स्तनांचे वाढते आकारमान

या काळात बऱ्याच स्त्रियांच्या स्तनाचा आकार आश्चर्यकारकरित्या वाढतो. अश्यावेळी गरोदरपणाचसाठी खास मिळणारे अंतर्वस्त्र आणि इतर कपडे वापरावे. काही स्त्रियांच्या स्तनाचा आकारमान अगदी अल्प प्रमाणात वाढतो तर काही स्त्रियांचा काही इंचाने वाढते.

५. अचानक उत्साही वाटायला लागते. 

काही महिला आपल्या दुसऱ्या त्रैमासिकात अचानक खूप उत्साही वाटायला लागते १४ व्या आठवड्य दरम्यान अनेक स्त्रियांना त्यांना कमी थकल्यासारखे आणि प्रसन्न वाटू लागते. कदाचित तुम्हांला पहिल्या त्रैमासिकात खावेसे न वाटणारे पदार्थ खावेसे वाटू लागतात अशा अन्नपदार्थ खाण्यास सुरवात करू शकतात. शिवाय, या काळात रात्रीची झोप चांगल्याप्रकारे लागायला लागते.

६. तुम्ही तुमच्या शरीराला आणि त्यातील बदलांना स्वीकारता

या काळात तुमचे पॉट दिसायला लागेल असते. त्यामुळे तुम्ही गरोदरपणात घालण्यात येणारे कपडे घालायला लागता. वाढणारे पोट, वाढणारा कमरेचा घेर, स्तनाचे वाढते आकारमान, वाढते वजन हे सगळे बदल तुमच्या बाळासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी होत असल्याचे तुम्ही स्वीकारता आणि त्याविषयी तुम्हांला न्यूनगंड वाटणे, लाज वाटणे असे काही प्रकार घडत नाही. तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता.

७. समागमाची इच्छा वाढते.

ज्यावेळी तुम्ही गरोदरपणाच्या ५व्या महिन्या पर्यंत पोहचता, त्यावेळी तुम्हांला तुमच्या समागमाच्या इच्छेत वाढ झाल्यासारखे जाणवते. हे एस्ट्रोजनच्या कितीतरी पट अतिस्रावामुळे घडते. तसेच या काळात तुम्हांला प्रसन्न उत्साही वाटत असते, उलट्या मळमळ कमी झालेली असते त्यामुळे तुमची समागमाची इच्छा वाढायला लागते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon