Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल वापरू नका नाहीतर .....

पूर्वी एकाच टॉवेल किंवा पंचा सगळ्यांसाठी वापरला जायचा. परंतु त्यावेळी तो रोजच्या रोज धुतला जायचा कडकडीत उन्हात वळवला जायचा. महिन्यातून एकदा असे कपडेउकळत्या पाण्यातून काढले जायचे. त्यामुळे योग्य ती स्वच्छता राखली जायची . आज प्रत्येकाचा स्वतंत्र टॉवेल असले तरी त्याची निगा राखायला एवढा वेळ कोणाकडे नाहीये त्यामुळे काही छोट्या टिप्स वापरुन स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा यामुळे कोणत्याही प्रकारचे त्वचारोग होण्याची शक्यता कमी होईल. या टिप्स कोणत्या ते आपण पाहणार आहोत. 

१.  दुसऱ्यांचा टॉवेल वापरू नका. यामुळे ऍलर्जीचे जिवाणू त्वचेचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. 

२. अंघोळीनंतर स्वच्छ धुतलेला टॉवेल वापरा. न धुतलेल्या टॉवलमध्ये असलेल्या जिवाणूंमुळे त्वचाविकार होऊ शकतात.

३. टॉवेल रोज किंवा एक दिवसाआड धुवा. मळलेल्या टॉवलमुळे खाज, खरुज, त्वचेवर  येणे, असे आजार होतात.

४. टॉवलने अंग आणि डोके जोराने न घासता हलक्या हाताने पुसा. नाहीतर त्वचा कोरडी होईल. त्वचेचा ओलावाही नष्ट होऊ शकतो.

५. टॉवेल नेहमी उन्हात वाळवा. बाथरूममध्ये ठेवू नका. कारण त्वचेला हानीकारक रोगजंतू टॉवेलमध्ये जाऊ शकतात.`

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon