Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

टॉन्सिलच्या बाबतीत आढळून येणारा टॉन्सिलिटिस म्हणजे काय ?

आपण बऱ्याचदा टॉन्सिलच्या तक्रारी ऐकत असतो मुख्यतः लहान मुलांच्या बाबतीत ही तक्रार बऱ्याचदा आढळून येते. तसेच मोठयांमध्ये देखील आढळून येते.टॉन्सिलिटिस म्हणजे काय हे बहुतेक जणांना माहित नसते.याविषयी कोणालाच पक्की माहिती नसते. टॉन्सिलिटिस म्हणजे काय काय हे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. 

टॉन्सिलिटिस म्हणजे काय ? 

जिभेच्या तळाशी असणारे टॉन्सिल हे शरीरात घातक जिवाणू शरीरात प्रवेश करू न देता शरीरात घातक  जिवाणू जाण्यापासून रक्षण करतात. या टॉन्सिल्सला अनेकदा संसर्ग होतो आणि ते सूजतात आणि त्यामुळे गिळायला त्रास होतो. टॉन्सिल्सला सूज येते कधी-कधी श्वास घेताना देखील त्रास होतो हा त्रास  ८ ते १० दिवस चालू शकतो या संसर्गास या त्रासाला ( सूज आल्यास )टॉन्सिलिटिस म्हणतात.  

टॉन्सिलिटिस होण्याची कारणे 

१. विषाणूंमुळे होणार संसर्ग किंवा कुठल्याही प्रकारच्या संसर्ग आणि त्यामुळे येणारी सूज 

२. वातावरणातील बदल, अति थंड वातावरण होणे. 

३. सततचा सर्दी-खोकला असणे. 

४.सतत थंड पदार्थांचे सेवन करणे. 

५. प्रदूषण असलेल्या ठिकाणी वावर असणे. 

लक्षणे 

१. टॉन्सिल्सला सूज येणे

२. घास दुखणे, खवखवणे 

३. गिळताना, बोलताना त्रास होणे 

४. श्वास घेताना त्रास होणे.

काय करावे 

प्रथमतः वरील लक्षणे आढळ्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन टॉन्सिलिटिस आहे का नाही याची खात्री करून घेणे. 

१. ज्यावेळी पाणी प्यावेसे वाटेल त्यावेळी झेपेल तेव्हढे  गरम पाणी प्यावे,

२. मऊसर पातळ पदार्थांचे सेवन करावे. 

३. हळदीची चिमूट तोंडात टाकवी आणि कोमट पाणी प्यावे.

४. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या. 

५. धूम्रपान करू नये नये आणि प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे 

सतत टॉन्सिलिटिस त्रास जाणवत असल्यास आणि त्यामुळे श्वास घेण्यास आणिअन्न गिळण्यास त्रास होत असल्यास डॉक्टर टॉन्सिल्स काढण्याच सल्ला देतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon