Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

तोंडाची स्वच्छता आणि प्रसूतीचा संबंध

 

गरोदरपणात स्त्रिया संपूर्ण आरोग्याची काळजी घेत असतात. आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक व दक्ष असतात. त्याचप्रमाणे गरोदरपणात दातांची काळजी घेणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. काहींना याबाबत खूप चिंतेची गोष्ट वाटणार नाही. म्हणून गरोदर माता  दातांच्या समस्येबद्धल दुर्लक्ष करतात. पण गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठी व सुलभ प्रसूतीसाठी दात व तोंडाची स्वच्छता व काळजी  महत्वाची भूमिका बजावते.

 दातांच्या स्वच्छतेचा प्रसुतीवरती परिणाम

१. गरोदरपणात दातांची समस्या सामान्यतः होत असतेच. ज्याला प्रेग्नसी जिंजीवाईटीस (गरोदरपणात हिरड्यांची समस्या) असे त्याला म्हटले जाते. गरोदर स्त्री आणि सामान्य स्त्री ( गरोदर नसलेली स्त्री) यांचा याबाबत अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, जी स्त्री गरोदर आहे तिच्या हिरड्यात सूज येते आणि काही वेळेस त्याच्यातून रक्तही निघते.

२. वास्तविकपणे, १० मधून ८ स्त्रियांच्या हिरड्या कमकुवत असणे, आणि दात व तोंडाच्या बाबतीत काही ना काही आजाराच्या बाबतीत तक्रार करत असते. तेव्हा या तक्रारी कारण्यावेळी डॉक्टरांना दाखवून द्या किंवा त्याच्यावर घरगुती उपाय करता येईल.

३. प्रसूतीनंतर बाळांनाही दातांसंबंधी, हिरड्याबाबत, आणि तोंडाबाबत आजार होणार नाही. बाळाचे दात वाकडे - तिकडे होण्याचा संभव कमी होतो.   

४.  बाळाच्या जन्म होण्याअगोदर,  डिलिव्हरीच्या अगोदर  जर तुम्हाला तोंडासबंधी कोणताही विकार, आजार असेल तर डेंटिस्ट कडे जाऊन तपासणी करावी. जर काही समस्या असेल तर तुम्ही उपचार करू शकतात.

५. गरोदरपणात दातांची व तोंडाची स्वच्छता करत राहावी. कारण काहींना ‘मिह’ नावाच्या संसर्गाचा बाळाच्या व आईच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो.

६. दिवसातून दोन वेळा ब्रश करावा. आणि मेडिकल मधून माउथवाशने तोंड साफ करावे. माउथवाशने गुळण्या कराव्यात.

७. माउथवाशमुळे तुमच्या दाताचे व तोंडाला होणारे विकार कमी होतात. याच्यामुळे ५६ टक्क्यांनी हिरड्याचे आजार कमी होतात.

तोंडाची स्वच्छता व्यवस्थित केली नसल्यास संक्रमण होण्याचा धोका असतो. आणि प्रसूतीनंतर त्याचा त्रास होतो. आणि त्या संक्रमणामुळे बाळालाही त्रास होईल. काही बाळांचे दात लहानपणापासून विचित्र येतात. तेव्हा अगोदर याबाबत जागरूक असा. कारण प्रसूतीनंतर जर दात दुखत असतील, दाढ काढायची पाळी आलीच तर एकदम बाळंतपण त्रासदायक व चीड-चीड करणारे होईल.
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon