Link copied!
Sign in / Sign up
20
Shares

तोंडाच्या दुर्गंधीवर हे घरगुती उपाय करा

सकळी उठल्यावर सगळ्यात आधी आपण दात घासतो. दैनंदिन जीवनात शारीरिक स्वच्छता हा एक महत्वाचा भाग आहे. पण तोंडाची दुर्गंधी ही समस्या आपण सर्वांनीच कधीना कधी अनुभवलेली असते. तोंडाची दुर्गंधी दातांमुळे किंवा तोंडात जमा झालेल्या बॅक्टेरियामुळे येते. या कंडीशनला ‘हॅलीटिसीस’ असे देखील म्हणतात. आरोग्याविषयी निगडीत एखाद्या समस्येमुळे सुद्धा तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.

तोंडाची दुर्गंधी का येते याची कारणे आपण पाहू.

१. तोंडाची निगा न राखणे.

       दिवसातून २ वेळा आणि काही गोड खाल्ल्यास दरवेळी तोंडाची स्वच्छता करणे अपेक्षित असते. जेवल्यानंतर चूळ भरणे व झोपतांना आणि उठल्यावर दात घासणे तोंडाच्या योग्य निगेसाठी आवश्यक आहे. तुम्ही एखादा पदार्थ खाता तेंव्हा तोंडात उपस्थित असलेला बॅक्टेरिया त्या अन्नाचे विघटन करतो. या विघटनाच्या प्रक्रियेमुळे तोंडाला वास येतो. दातात किंवा जिभेखाली काही अन्न बाकी असल्यास ते चूळ भरून काढून टाका. जेवल्यानंतर चूळ भरणे हा नियम सर्वांनी पाळायला हवा.

२. धुम्रपान.

धुम्रपान हे आरोग्यासाठी घातक असते तसेच तोंडाच्या वासासाठी देखील कारणीभूत असते. धुम्रपानामुळे तोंड कोरडे पडते आणि त्यामुळे दुर्गंधी येण्याची समस्या अजून वाढते. तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीची समस्या असेल तर धुम्रपान करणे टाळा.

३. विशिष्ट पदार्थांचे सेवन.

काही उग्र वासाचे पदार्थ जसे की मसाले, कांदा, लसूण इ. अशा पदार्थांना अतिशय उग्र वास असतो. या पदार्थांचे सेवन तोंडाच्या दुर्गंधीस कारणीभूत ठरते. हा उग्र वास ७२ तासांपर्यंत राहू शकतो. यासोबतच कॉफीचे सेवनाने देखील तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

४. आरोग्य समस्या.

हिरड्यांमध्ये समस्या असणे, टॉनसिल्स, सायनसचा त्रास अथवा जळकी लागणे अशा काही समस्यांमुळे अनेकजणांच्या तोंडाची दुर्गंधी येते. काही आरोग्यविषयक समस्या जसे कि मधुमेह, किडनी संबंधी समस्या यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. यासाठी मेडिकल चेकअप करून घेणे गरजेचे आहे.

ही दुर्गंधी सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणाशी बोलतांना तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरू शकते. अनेकदा खूप वेळ काही खाल्ले नसल्यास देखील तोंडाचा वास येतो. म्हणून जवळ एखादी वेलची किंवा च्विंगम ठेवणे कामास येते. इथे तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी काही घरगुती टिप्स दिल्या आहेत. या टिप्सचा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा.

१. नियमित दात घासणे.

रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपतांना दात घासणे अतिशय महत्वाचे आहे. जेवणातील पदार्थ दातांमध्ये अडकतात आणि रात्रभर तोंड बंद असल्याने बॅक्टेरिया त्या अन्नाचे विघटन करतांना तयार होणाऱ्या प्लेकचे चिकट पदार्थात रुपांतर होते. दात स्वच्छ करून झोपल्यास सकाळी तोंडाची खूप वास येणार नाही. सोबतच जेवल्यानंतर नेहेमी चूळ भरण्याची सवय लावा.

२. वेलची, लवंग आणि दालचिनी.

वेलची ही तिच्या वासासाठी खूप लोकप्रिय आहे. काही उग्र वासाचे पदार्थ खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी रोखण्यासाठी चूळ भरा किंवा दात घासा आणि एक वेलची तोंडात ठेवा. याने तोंडाला वेलचीचा वास येईल. सोबतच कांदा किंवा लसूण खाल्ल्यानंतर गुळाचा खडा वरून खाल्ल्याने देखील हा उग्र वास नाहीसा होतो.

वेलची ऐवजी तुम्ही लवंग किंवा दालचिनीच्या काड्या सुद्धा चघळू शकता. लवंग तिखट असते आणि दालचिनी किंचित गोड लागते. याचे अनेक उपयोग आहेत. दालचिनी मध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. तोंडातील अपायकारक बॅक्टेरिया ज्यामुळे तोंडाला वास येतो ते दालचिनीमुळे नाहीसे होतील. याशिबाय अन्नपचनासाठी देखील दालचिनी उपयोगी ठरते. लवंग देखील अँटी -फंगल आणि अँटी - मायक्रोबिअल असते.

३. ग्रीन टी.

ग्रीन टीचा सुगंधी वास असतो आणि सोबतच यात अनेक अँटी-आॅक्सिडेंट्स असतात. ग्रीन टी मधील कॅटिकन्स काही काळासाठी तोंडाची दुर्गंधी पळवतात. जेवणानंतर किमान २ तासांनी ग्रीन टी पिणे तुम्हाला उपयोगी ठरेल.

४. मिठाच्या पाण्याने गुळणी करणे.

मिठाचे पाणी तोंडामध्ये आणि घशात जे बॅक्टेरिया जमलेले असतात त्यांचा नाश करते. अल्कली पदार्थांमुळे हे बॅक्टेरिया तोंडात वाढतात. मिठाचे पाणी आम्लधारी असते. तोंडाच्या दुर्गंधीची समस्या कमी करण्यासाठी दिवसातून २ वेळा कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळणी करा.

५. व्यायाम.

नियमित व्यायाम आरोग्यासाठी उपयुक्त असतो. व्यायामाचे महत्व आपल्या सर्वांनाच माहित आहे. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि त्यायोगे पेशींची एकूण निर्मिती उलाढाल देखील वाढते. व्यायामामुळे तोंडातील अपायकारक बॅक्टेरिया ज्यामुळे दुर्गंधी येते त्यांची संख्या कमी होते आणि चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. व्यायामाने अन्नपचन सुधारते आणि त्यामुळे तोंडाचा वास येत नाही.

६. बेकिंग सोडा.

बेकिंग सोड्याचे अनेक उयोग आहेत. हा पदार्थ आम्लधारी असल्याने तोंडात बॅक्टेरिया तयार होण्यापासून बचावतो.

१. १/२ चमचा बेकिंग सोडा १ कप पाण्यात मिसळून घ्या. ये पाण्याने नियमित गुळणी करा. काही दिवसांनी तोंडाच्या दुर्गंधीची समस्या नाहीशी होईल.

१. एक चमचा बेकिंग सोडा घेऊन हाताच्या बोटाने दातावर घासा. बेकिंग सोडा दात स्वच्छ करण्यासाठी देखील उपयोगी आहे.

७. तुळस आणि पुदिना.

तुळशीची ४-५ पाने जेवल्यानंतर खा. तुळस ही अँटी-बॅक्टेरिअल असते तुळशीच्या पानांना देखील एक प्रकारचा वास असतो. जेवल्यानंतर ही पाने खाल्ल्यास तोंडाचा वास येणार नाही आणि दुर्गंधी असल्यास ती तुळशीच्या पानांच्या वासामुळे बाहेर येणार नाही. तुम्ही इतर वेळी देखिल तुळशीची पाने खाऊन तोंडाची दुर्गंधी पळवू शकता.

पुदिना हा अन्नपचन आणि अॅसिडीटीच्या समस्येवर उपयोगी असतो. अॅसिडीटी मुळे जळकी लागते आणि अन्न पचन व्यवस्थित न झाल्यास तोंडचा वास येतो. पुदिन्याचे सरबत पिणे किंवा याच्या गोळ्या चघळल्याने तोंडाचा येणारा वास पुदिन्याच्या वासामुळे येणार नाही.

८. लिंबू.

लिंबू हे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी प्रभावशाली आहे. जेवणानंतर ताटातले लिंबू चोखून खाल्ल्याने अन्नपचन सुधारते आणि तोंडाला खाल्लेल्या अन्नाचा वास येत नाही. जेवणानंतर किमान १/२ तासाने लिंबू-पाणी पिल्यास तोंडाची दुर्गंधी येणार नाही. मीठ आणि लिबू एकत्र करून दात घासल्याने दात स्वच्छ होतात.

तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधी ची समस्या असल्यास वरील घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.
Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon