Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

तिसऱ्या त्रैमासिकात होणाऱ्या वेदना आणि अनिद्रा


कोणत्याही महिलेसाठी नऊ महिने आपल्या गर्भात एखादा भ्रूण वाढवायचा म्हणजे दर दिवशी नव्या आव्हानाला सामोरे जाणे. प्रत्येक त्रैमासिकात जसे बाळ विकसित होत जाते तसतशा त्या महिलेचे स्वास्थ नाजूक आणि गुंतागुंत वाढत जाते. सकाळी उठल्यानंतर येणारा थकवा,पाय आखडणे,अंगदुखी,वजन वाढणे,जळजळ, बध्दकोष्ठता या सगळ्यावर मात करून आई तुम्हाला सुखरूपपणे या जगात आणते यासाठी तुमच्या आईला नेहमीच सलाम करा. तिसरा त्रैमासिकात म्हणजे अंगदुखी आणि निद्रानाश उभा याला बहुतांश स्त्रियांना सामोरे जावे लागते. विशेषत: पाठ,कंबरदुखी, अनिद्रा,ओटीपोटातील वेदना इत्यादी. दिवसभर या वेदना सहन केल्यानंतर एका गर्भवती महिलेला काय हवे असते तर रात्रीची शांत झोप. दुदैवाने तिला निद्रानाशाचाही असाच त्रास होतो.

अशा त्रासात असलेल्या सर्व मातांसाठी आज काही टिप्स बघूया :
गर्भवस्थेत निद्रानाश आणि वेदना होण्याची नेमकी कारणे :

जेव्हा गर्भवती महिलेचा शेवटचा म्हणजे तिसरा त्रैमास सुरू होतो तेव्हा तिचा गर्भ बऱ्यापैकी मोठा झालेला असतो. वाढत्या गर्भाचा आकारामुळे नेमका काय त्रास होत आहे हे सांगणे अशक्य असते, मूत्राशयावर दबाव आल्याने वारंवार लघवीसाठी जावे लागते हे निद्रानाशाला कारणीभूत ठरते. संप्रेरकात होणारे बदल (प्रोजेस्टेरॉन,अ‍ॅस्ट्रोजनचा वाढलेला स्तर,पाठदुखी, आखडलेले शरीर, पित्ताचा त्रास,छातीत जळजळ यामुळेही गर्भवती

महिलांना तिसऱ्या त्रैमासिकात निद्रानाश होतो. वाढलेले पोट हे एक महत्वाचे कारण आहे चांगली झोप न लागण्याचे.बऱ्याच महिला गर्भारपणाच्या काळात वेदना होत असल्याची तक्रार करतात, विशेषत: शेवटच्या काही महिन्यात. येथे पुन्हा एकदा प्रमुख कारणीभूत घटक म्हणजे संप्रेरकांची असंतुलित पातळी देखील असते. ओटीपोट जितके जास्त लवचिक असेल तर प्रसूतीदरम्यान बाळ लवकर बाहेर येण्यास मदत होते. ओटीपोटाला लवचिक बनविण्यासाठी प्रोजेस्टेरॉनचा वाढलेला स्तर हा स्नायू आणि सांध्यांना विश्रांती देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे सतत वाढणाऱ्या  गर्भाला जागा करू देण्यासाठी लवचिक स्नायू उपयोगी पडतात. शेवटच्या त्रैमासिकात दुदैवाने हे स्नायू विश्रांतीमुळे त्यांचे कार्य करण्यास कमी पडतात आणि पाठ, कमरेवर आणि नितंबावर वेदना होतात.जसा गर्भाचा आकार वाढतो तसतसे हिपवर दबाव वाढत जातो,परिणामी कंबरदुखी या सारखे आजार अस्वस्थ करतात. काही स्त्रियांचे पूर्वीचे वाढलेले वजन आणि गर्भवती असतानाचे वजन याचा दबाव येऊन मणक्याचे दुखणे मागे लागते.


निद्रानाश आणि वेदना दूर करण्यासाठी टिप्स :

१. रात्रभर झोप न लागल्याने दिवसभर शरीर तोच ताण घेऊन वावरत असते.गर्भवती असताना काही महत्वाच्या गोष्टी जर नियमित पाळल्या तर त्रैमासिकातील वेदना आणि निद्रानाशापासून मुक्ती मिळते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon