Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

डोकेदुखीवर सोपे व घरगुती जालीम उपाय


डोकेदुखीचा त्रास बऱ्याच व्यक्तींना असतो आणि तो पेनकिलर किंवा सॉरिडॉन घेऊन दूर करता येतो. पण सतत त्या गोळ्यांची सवय तुम्हाला लागते कारण डोकेदुखी कधी ना कधी दुखतच असते. आणि सतत गोळ्या घेतल्याने तुम्हाला त्याची सवय इतकी लागते की, नंतर कितीही पेनकिलर घेतले तरी त्याचा परिणाम होत नाही. तेव्हा डोकेदुखीवर पेनकिलर घेण्यापेक्षा जर घरगुती उपाय केले तर तुम्हाला आराम मिळू शकतो.

१) आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं

२) शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.

३) सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.

४) दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.

५) डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

६) शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.

७) सध्या उन्हाळा चालू आहे तेव्हा डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

८) आता ह्या उन्हाच्या दिवसात तुम्ही हा उपाय करा. अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon