Link copied!
Sign in / Sign up
60
Shares

तीन ते चार वर्षांचा मुलांचा विकासबद्दल जाणून घ्या.

तुमचे बाळ ज्यावेळी तीन ते चार वर्षांचा होते तेव्हा एखाद्या शाळेत जाऊ लागते. ही खरंतर ‘जादूई वर्ष’असतात. पहिली दोन वर्ष ज्याप्रमाणे मुलाचे भावविश्‍व बनविण्यासाठी जसे झटत असता तशीच पुढील दोन वर्षे देखील महत्वाची असतात. या वर्षांमध्ये मूल शाळेत जायला लागल्यापासून त्याचे कल्पनाविश्‍व मोठे होते. या दरम्यान तुमच्या शाळेत जाणार्‍या या चिमुकल्याचा विकास कसा होतो हे समजून घेऊ 

१. शाररिक विकास 

आतापर्यंत तुमचे तीन ते चार वर्षांचे मूल कौटुंबिक वेळापत्रक अंगीकारले असेल. उदाहरण द्यायचे झाले तर रात्रीचे जेवण रोज आठ वाजता,नाश्त्याचे वेळ इत्यादी. मुलाचे शाळेनुसार वेळापत्रक करून ठेऊ शकता,सुरवातीला त्यांचे मन वळवायला त्रास होण्याची शक्यता आहे. या वयातील मुले बऱ्यापैकी स्वतंत्र झाल्याचे तुमच्या निरिक्षणात आले असेल. तुम्हाला आश्‍चर्य वाटत असेल की, रोज दात घासणे,शौचालयाचा व्यवस्थित वापर करणे यासारख्या क्रिया ते व्यवस्थित करू शकतात. स्वत:च्या हाताने खाणे,पादत्राण्याची नाडी बांधणे,स्वत:च्या हाताने कपडे घालणे,लिहताना पेन्सिल हातात बरोबर धरणे या छोट्या क्रिया ते करू शकतात.

या वयात तो प्रचंड वेगाने धावतो,पायऱ्या चढतो,उड्या मारू शकतो,बॉल फेकणे , पकडणे यासारख्या गोष्टी ते सहज करतात आणि यासाठी पालक म्हणून तुम्ही जास्ती उर्जा,वेळ द्यायला हवा.

२. शिक्षण  

या वयातील तुमचा मुलगा किंवा मुलगी काय,कधी,केव्हा,कुठे,कशाला असे जर प्रश्‍न विचारत असाल तर ते योग्य मार्गावर आहेत. तुमच्या मुलाची स्मरणशक्ती चांगली वाढत आहे हे लक्षात घ्या. तो किंवा ती आता मुळाक्षरे लक्षात ठेवतात,रार्‍हिम्स, सोप्या गोष्टी ऐकून त्या दुसर्‍याला शेअर करतात. चौथे वर्ष लागलेल्या मूल एक मोठे वाक्य समजू शकतात. चित्र ओळखू शकतात,त्यांची स्मृती शब्दांचे संदर्भ लावण्याचा प्रयत्न करते.

लहान मुले खेळताना अतिशय कल्पनाविश्‍वात रमणारी असतात.त्यांची मानसिक परिस्थिती अतिशय वेगवेगळी बदलणारी असते. त्यांना लिंगभिन्नता कळते,हाता-पायांची बोटे मोजता येतात,दिवस-रात्रीच्या संकल्पना समजू लागतात.

३. भावनिक विकास 

 

 

याच वयात तुमचे मूल तुम्हाला सांगते की,त्याच्या भावना नक्की काय आहेत आणि त्या इतरांपेक्षा किती वेगळ्या आहेत. एखादी प्रतिक्रिया देताना ती पालक म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष देऊन ते ऐकणे महत्वाचे असते. तुम्ही त्याकडे लक्ष देऊन ते ऐकणे महत्वाचे असते. मुलांना आनंद, दु:ख,राग, भिती अशा सर्व भावना व्यवस्थित समजू लागतात. कधी कधी त्यांचे कल्पना विश्‍व प्रत्यक्षात उतरविण्यासाठी खूप कष्ट करत असतात. यामध्ये पालक म्हणून त्यांना यासाठी मदत करावी,पुरेसा वेळ,स्वातंत्र्य द्यावे.

४. पालकांसाठी टिप्स 

जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला गोष्ट सांगता तेव्हा त्यात एखादे गाणे, लयबध्दपणे शिकवा यामुळे त्यांना नवीन संकल्पना,शब्द समजण्यास सुरवात होते. गोष्ट उलगडून सांगणे ही देखील एक शिक्षण प्रक्रियाच आहे. लक्षात ठेवा तुमच्या मुलासोबत जास्तीत जास्त वेळ खेळा जसे की, चित्र रंगवा,काढा, संगीताचे खेळ खेळा. पालक म्हणून तुम्ही लहान मुलांसोबत खेळताना थकून जाऊ शकता,मात्र कोणत्याही कारणास्तव मुलांवर राग काढू नका.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon