Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

तीळ आणि तिळाचे लाडू खाण्याने हा फायदा होतो !!

मकर संक्रातीमध्ये तीळचा वापर खूप केला जातो. आणि तिळाचे लाडूसुद्धा खूप खात असतात. तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो की, मकर संक्रातीत तीळ का खातात. पहिले म्हणजे ह्या वेळी खूप थंडी असल्याने आणि तीळ ही गरम असते. तुमचे शरीराचे तापमान हे सम राहण्यास मदत होते. आणि ह्यावेळी ह्या तीळ खाण्याचा काय फायदा होत असतो. त्याविषयी आपण ह्या ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत. 

१) ह्यावेळी जर तुम्ही अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.

२) तीळ खाण्याचा जितका फायदा चांगल्या आरोग्यसाठी होतो. तितकाच त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त. तीळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.

३) ज्यांची त्वचा एरवीही कोरडी पडते त्यांनी एरवीही थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

४) मात्र ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत. ज्यांना मधुमेह आहे अशांनी संक्रांतीच्या काळात तीळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

५) तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.

६) याबरोबरच आपण भाजीला दाण्याचा कूट घालतो त्याऐवजी थंडीमध्ये तीळाच्या कूटाचा वापर केल्यास तोही फायदेशीर ठरतो. यामुळे भाजीला एक वेगळी चव येते.

७) थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.

८) बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. यामुळे पुरेसे दूध येण्यास उपयोग होतो.

९) ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.

१०) दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

    साभार - वैद्य लीना बावडेकर, (लोकसत्ता) 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon