Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

ती’ ची प्रसूती झाली मोकळ्या शेतात : स्त्रियांनी केली साडीची भिंत


अजूनही भारतात कठीण परिस्थितीत स्त्रीची प्रसूती कुठे रेल्वेत होते तर बसमध्ये तर काही वेळेला रस्तातसुद्धा होऊन जाते. हेच भारतातल्या काही स्त्रियांच्या जीवनातले सत्य आहे पण ते खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. आपण भारत माता म्हणतो देशाला पण त्याच स्त्रियांचा आदर आपल्याला ठेवता येत नाही. तर अशीच एक घटना ओडिशामध्ये घडली.

मध्य प्रदेश मध्ये एका सरकारी दवाखाण्याच्या पुढेच एका स्त्रीची प्रसूती शेतात झाली. झाले असे की, त्या स्त्रीला तिथल्या रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी आणले पण तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की, बाळ पोटातच दगावले आहे आणि तुम्हाला आम्ही ऍडमिट करू शकत नाही. आणि हे सर्व डॉक्टरांनी तपासणी न करता सांगून टाकले.

तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयातल्या डॉक्टरांना खूप समजून सांगण्याच्या प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचे काहीच ऐकून न घेता बाहेर हाकलून लावले.

मग त्यानंतर त्या स्त्रीला खुपच वेदना व्हायला लागल्या. तिला वेदना होत असतानाचे दृश्य तिथल्या स्थानिक स्त्रियांनी पाहिले आणि त्यांनी त्यावेळी रुग्णालयाच्या समोर शेत होते तेही मोकळे होते. तेव्हा त्यांनी आडोशाला साड्यांची भिंत बांधली आणि आणि स्वतःच तिला दिलासा देत तिची प्रसूती केली.

आणि देवाच्या कृपेने तिचे बाळ आणि ती स्त्री सुखरूप आहे.

तुम्हाला चित्रात दिसत आहेच की, कशा प्रकारे स्त्रियांनी त्या आईला मदत केली. आणि तिची प्रसूती मोकळ्या रानात झाली की, तिथे तिला बेड ही नव्हता. तिने किती वेदना झेलल्या असतील. ह्याची कल्पनाही करता येणार नाही. आपण तिच्यासाठी व तिच्या बाळासाठी प्रार्थना करू. 

फोटो साहाय्य - सामना 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon