Link copied!
Sign in / Sign up
91
Shares

थायरॉईड आणि गर्भारपण : थोडक्यात आढावा

आपल्या शरीरात काही अंत:स्रव करणाऱ्या ग्रंथी असतात, ज्यांचं काम शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखणं असं असतं. या ग्रंथींपैकीच एक ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी होय. ही ग्रंथी गळ्याच्या मधल्या भागात असते. मात्र या ग्रंथीच्या असंतुलमुळे शरीराचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. या थायरॉईड ग्रंथी बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. 

थायरॉईड ग्रंथी

थायरॉईड ग्रंथीमधून दोन प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात एक टी३ आणि दुसरं म्हणज टी ४. या ग्रंथी आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमला नियंत्रित करण्याचं काम करतात.टी३ हे हार्मोन १० ते ३० मायकोग्राम आणि टी४ हे ६० ते ९० मायकोग्राम अशा स्वरूपात बाहेर पडत असतं. निरोगी व्यक्तीमध्ये या दोन्ही हार्मोन्सची मात्रा प्रमाणात असते. जेव्हा यात काही बिघाड होतो त्यावेळी या ग्रंथींच्या स्त्रावाचाप्रमाण हे वाढतं किंवा कमी होतं.

थायरॉईड होण्याची कारणं कोणती?

अनुवंशिकता,खाण्यात आयोडिनचं प्रमाण कमी असल्यास,अति चिंता करणे,खाण्याच्या चुकीच्या पद्धती रात्री जागरण करणे, अनियमित आणि अयोग्य जीवनशैली  या काही कारणांमुळे थायरॉईड होण्याची शक्यता असते. 

थायरॉईडचे प्रकार
 हाईपोथायराईडिज्म

थायरॉईडचे प्रमुख दोन प्रकार आहेत एक म्हणजे हाईपोथायराईडिज्म आणि दुसरा म्हणजे हायपरथायराईडिज्म. पैकी टी४ या थायरॉक्सिनची हार्मोनची पातळी कमी झाली तर टीएसएचची पातळी वाढते तेव्हा त्याला हाईपोथायराईडिज्म असं म्हणतात.

हायपरथायराईडिज्म

तर टी४ या थायरॉक्सिनची हार्मोनची पातळी वाढल्यास टीएसएचची पातळी कमी होते तेव्हा या प्रकाराला हायपरथायराईडिज्म असं संबोधलं जातं.

लक्षणे

७० टक्के लोकांना आपल्याला थायरॉईड आहे याची मुळात कल्पनाच नसते की  आपल्याला थायरॉईड आहे. पुढील काही लक्षणे वारंवार आढळल्यास थायरॉईड आहे का ?याची  तपासणी करून घ्यावी 

१.भूक कमी लागणे पण वजनात वाढ होत जाणे

२. हृदयाचे ठोके कमी होणे

३. गळ्याच्या आसपासच्या भागात सूज येणे

४. उन्हाळ्यातही थंडी वाजणे 

५. आळस वाटणे

६. अशक्तपणा जाणवणे

७. नैराश्य 

८. घाम कमी येणे

९. त्वचा कोरडी होणे

१०.केसांच्या गळतीत वाढ होणे

११. स्मरणशक्ती कमी होणे

१२.स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते.

गरोदरपण आणि थायरॉईड

गर्भारपणात थायरॉईड ग्रंथी खुप महत्वाची भूमिका बजावते,आईच्या शरीरातील संप्रेरकीय बदल आणि बाळाच्या वाढीत देखील ही ग्रंथी महत्वाची भूमिका बजावते. गर्भारपणाच्या आधीच जर हाईपोथायराईडिज्म,हायपरथायराईडिज्म असेल तर तुम्हांला विशेष काळजी घेणे आवश्यक असते.गर्भारपणातील काही लक्षणे आणि थायरॉईडची लक्षणे ही बऱ्याच वेळा सामान असण्याची शक्यता असते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.   

थायरॉईड  नियंत्रण काय करण्यासाठी घरगुती उपाय 

ही समस्या असणाऱ्या महिलांनी औषधांबरोबरच जोडीला नियमित व्यायाम करावा. तसेच शांत आणि स्वस्थ राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा. ताणतणाव, चिंता यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि गरोदरपणात या गोष्टी नक्की पाळाव्यात. आरोग्यदायी जीवनशैली असावी. क्रोधावर नियंत्रण ठेवावे 

 आहार 

ही समस्या असणाऱ्यांनी  हलका आहार घ्यावा घरचे वरण,आमटी भात भाजी पोळी तसेच  अन्न शिजवताना कमी तेल वापर करावा. आणि आहारात  हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. तिखट किंवा मसालेदार खाणं कमी करावं. तेलकट पदार्थ,फास्ट-फूड यांचं सेवन करू नये

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon