Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

थंडीत अश्या प्रकारे घ्या पायांची काळजी.

 

थंडीला सुरवात झाली आहे. सतत स्वेटर घालावंस वाटत नसलं तरी त्वचेवर थंडीचा परिणाम जाणवू लागतो. तसेच या दिवसांत ऑफिसमध्ये अधिक काळ एसीत बसल्यामुळे पायाची त्वचा कोरडी होणे, भेगा पडणे असे विकार उद्भवतात. ते उद्भवू नये म्हणून पुढील प्रकारे पायांची काळजी घेणे आवश्यक आहे.

१. मोजे वापरा

तुम्हांला पायाचं संरक्षण करायचं असेल तर मोजे वापरणं अतिशय आवश्यक आहे. मोज्यामुळे त्वचेचं थंडीपासून संरक्षण होतं. थोडी थंडी कमी होते.त्यामुळे मोज्याचा अवश्य वापर करा.

२. आरामदायक चप्पल

आपले पाय गरम राहावेत म्हणून बुट वापरणं कधीही चांगलं. सगळ्या बाजूंनी बंद असलेले बुट बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात. जेणेकरून बाहेरचा बोचरा वारा तुमच्या पायापर्यंत पोहोचत नाही. तुमच्या पायाची गरज ओळखून बुटाची निवड करा. कारण या थंडीच्या दिवसांत पाय उबदार ठेवणं गरजेचं असतं. तुमच्या पायाची त्वचा अतिशय संवेदनशील असेल आणि तुम्हाला या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसांत बुटाचा वापर करणं आवश्यक आहे.

३. पायांना मॉइश्चर लावा

रात्री झोपण्यापूर्वी चेह-याप्रमाणेच पायालादेखील कोल्ड क्रीम लावा. स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पायाला मॉइश्चर लावणं अधिक गरजेचं आहे. कारण मॉइश्चर लावल्याने त्वचा मऊ राहते. ती कडक होत नाही त्यामुळे तिला भेगा पडत नाही. त्यासाठी बाहेरचे महागडे क्रीम्स किंवा गोष्टी वापरण्याची गरज नाही. तुम्ही खोबरेल तेल,तूप किंवा ऑलिव्हचे तेल, तिळाचे तेल कोकम तेल हे वापरले तरी हरकत नाही. त्यामुळे थंडीत टाचांना पडणाऱ्या भेगांसाठी त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो.

४. घरच्या घरी पेडिक्युअर

पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवावेत. पाच मिनिटांनंतर पायावरील मृत त्वचा स्क्रबिंग करून काढून टाका. त्यानंतर पायाची वाढलेली नखं कापून त्यांना व्यवस्थित आकार द्या. त्यानंतर तुमच्या पायांना मॉइश्चर लावा. म्हणजे पायाची त्वचा मुलायम होते.

५.आठवड्यातून एकदातरी पायाला स्क्रब करा

याबरोबरच आठवड्यातून एकदातरी पायाला स्क्रब करायला विसरु नका. यासाठी तांदळाच्या पीठाचा वापर करा. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण भेगांना लावा. १० मिनिटे लावून ठेवल्यानंतर पाय धुवून टाका.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon