Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

थंडीत हे पदार्थ खा ! अंगाला लागेल


थंडीत खाल्लेले अंगाला लागते असे म्हटले जाते तेव्हा तुम्हीही अंगाला लावून घ्या. त्यासाठी कोणती पदार्थ खायची. आणि थंडीत आपण आहार बदलायला पाहिजे. ती शरीराची गरज असते व निसर्गाने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकून रहावी यासाठी तशी सोय केलेली आहे. व्हिटॅमिनस ही खास थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी फायदेशीर असतात. व्हिटॅमिन ए, बी १२, सी आणि डी तसेच झिंक आणि सेलेनियम हे घटक उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. थंडी आणि फ्लू यांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी या व्हिटॅमिन्सचा उपयोग होतो.

१)व्हिटॅमिन डीसाठी ऊन हा उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात काही काळ बसल्यास त्याचा व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी फायदा होतो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

२) काही सप्लिमेंटस ही आहारात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तुम्ही आहारात अशा सप्लिमेंटसचा समावेश करु शकता. मात्र त्यासाठी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

३) शरीरातील पेशींचे कार्य सुधारण्यास व्हिटॅमिन ए उपयुक्त असते. त्वचेचे विविध संसर्गांपासून संरक्षण होण्यासाठी व्हिटॅमिन एचा उपयोग होतो. भाज्या, फळे, दूध, टोमॅटो, पालक, रताळी, सोयाबिन, कोथिंबीर, लोणी, चीज, मासे, गाजर यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते.

४) थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी खाऊ घालावी. बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, ट्रिप्टोफेन, फायबर, व्हिटॅमिन- बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.

५) बदाम सालीसकट खाल्ल्यास ते जास्त पौष्टीक असतात. बदामात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि फायबर उपलब्ध असते. बदामात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते. हृदय आणि रक्त धामन्या (arteries) सुरक्षित बदाम उपयुक्त ठरतो. बदामात असलेले ६५ टक्के मोनोसॅच्युरेटेड फॅट शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

६) हिवाळ्यात मधाचा आरोग्याला फायदा होतो. मधामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊन रोग प्रतिकारक शक्तीही वाढते. शरीराला निरोगी, स्वस्थ आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी मधाचे सेवन आरोग्यदायी आहे.

७) नेहमीच्या आहारात आले वापरल्यास छोट्या-मोठ्या आजारांपासून दूर राहणे शक्य आहे. हिवाळ्यात कोणत्याही स्वरुपातील आल्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि डायजेशनही चांगले राहते. आलं उत्तम पाचक असल्याने पोटदुखी आणि अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.

८) शेंगदाण्यामध्ये लोह, कॅल्शिअम आणि झिंकचा उत्तम स्रोत आहे. मुठभर शेंगदाण्यामध्ये ४२६ कॅलरीज, ५ ग्रॅम कार्बोहायड्रेट, १७ ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये व्हिटॅमिन इ, के, आणि बी ६ भरपूर प्रमाणात असते. यामध्ये उपलब्ध असलेले अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन, मिनिरल्स आदी तत्त्व फायदेशीर ठरतात.

साभार- लोकसत्ता 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon