Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

थंडीच्या दिवसात बाळ खूप रडत असेल तर ह्या गोष्टी तपासून घ्या ….


थंडी खूप पडतेय. ना ! थंडीच्या दिवसात खूप छान व आल्हाददायक वाटत असते. खूप सारी मजाही वाटते कारण आपल्याकडे थंडी सोडून नेहमी उकडतच असते. तेव्हा ह्या हिवाळ्यात तुम्ही मजा करायचे ठरवले असेलच. किंवा केलीही असेल. म्हणजे हिवाळा सर्वांनाच आवडत असतो. पण ज्यां आईंचे बाळ खूप लहान असते किंवा ३ वर्षाखाली जरी असले तरी त्या आईंचा हिवाळा मौजमजेत ठरवूनही जात नाही. कारण तुमच्या बाळाला सतत काही ना काही होत असते. सर्दी तर खूप सामान्य पण खोकला आणि मग त्याची तब्येतच बिघडते. आम्हालाही बरीच मॉम्सनी सर्दी - खोकल्यावर काय करता येईल ह्याविषयी विचारले. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण जाणून घेऊ की, आपले बाळ नेमक्या कोणत्या कारणांनी रडत असते.

१) बाळाचे नाक बंद होऊन जात असते

हिवाळ्याच्या दिवसात आपल्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे नाक बंद होऊन जाते. कधी कधी सकाळी उठल्यावर श्वास घेताना जाणवते की, आपले नाक बंद झाले आहे. तेव्हा तान्ह्या बाळांची काय परिस्थिती होत असेल. तर तुमच्या तान्ह्या बाळालाही सर्दीमुळे त्याचे नाक बंद होऊन त्याला श्वास घ्यायला अडचण येते आणि त्यामुळे तो जोरजोराने रडायला सुरुवात करतो. आणि तुम्हालाही कळत नाही की, बाळाचे दूध पिऊन झाले तरी बाळ का रडत आहे. तेव्हा नाक बंद झाल्यामुळे तो रडत असतो.

२) बाळाची चड्डी(नॅपी) तर ओली नाही

पहिलेच थंडी खूप आणि त्याच्यात तुमच्या तान्ह्याची नॅपी ओली तर त्यात बाळ रडणारच ना ! तेव्हा ह्याबाबत खूप सावध असा की, बाळ का रडत आहे. त्याची नॅपी ओली असेल तर ती लगेच बदलून घ्या. आणि बाळाला बोलता येत नसल्याने तो सांगूही शकत नाही की, “ मम्मी, माझी नॅपी ओली झाली आहे.” तेव्हा मधे - मधे तपासून घेत चला की, बाळाची नॅपी ओली तर नाही ना ? ओली असेल तर बदलून घेतल्यावर त्याला उबदार वाटेल.

३) स्वेटरचे ओझे

तुमच्या क्युट बेबीला थंडी वाजेल म्हणून तुम्ही खूप स्वेटर, शाल, गोधडी आणि त्यात टोपी असे बरेच काही घालून ठेवतात आणि त्यामुळे बाळाला रात्री झोपण्याच्या वेळी त्याला श्वास घ्यायला अडचण होऊन जाते. किंवा बऱ्याच लहान बाळांना मोकळे झोपायचे आवडत असल्याने त्यांना इतके कपडे व ते ओझं सहन होत नाही. म्हणून ते रडायला लागतात. म्हणून कमीतकमी आणि त्याला मोकळे वाटेल असेच त्याला स्वेटर वैगरे घालून द्या.

४) भूक लवकर लागते

हिवाळ्यात त्यांनाही लवकर भूक लागून जाते. आणि थंडीमुळे ती खूप कमी दूध पितात. म्हणून त्यांना भूक लागली असेल का ? हे तपासून घ्या. झालेच तर तुमच्या घरात सकाळचे कोवळे ऊन येत असेल तर त्याला त्या उन्हात स्तनपान करा. त्यात तुम्हालाही बरे वाटेल आणि बाळालाही कोवळ्या उन्हाने ड” जीवनसत्व मिळेल.

५) तान्ह्याला खूप थंडी वाजत असेल

बाळाला थंडी वाजत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही त्याच्या पोटाला हात लावून समजू शकता. आणि त्याला थंडीचा कमी त्रास होण्यासाठी कोमट तेलाने सकाळी कोवळ्या उन्हात मालिश करून घ्यायची. हाता- पायाला मोजे घालून द्यायचे. सामान्यतः थंडीत बाळ ह्या कारणांनी रडत असते. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना  एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon