Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

टायमिंग बर्थ म्हणजे काय ?


अनेक बाळंतपणे होणे, दोन बाळंतपणांमध्ये फार कमी अंतर असणे किंवा वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर गर्भधारणा येणे राहणे ह्यामुळे स्त्रियांचे जीवन संकटात सापडते व किमान एक तृतीयांश अर्भकांचे मृत्यू ओढवतात. स्त्रिया व मुलांचे आरोग्य सुधारण्याचा अतिशय सबळ उपाय म्हणजे कुटुंबनियोजन. विकसनशील देशांमधील 100 दशलक्षांपेक्षा ही अधिक स्त्रिया सांगतात की त्यांनी गर्भनिरोधक साधनांची मागणी केल्यास त्यांच्या नवर्याकडून किंवा संबंधित पुरुषाकडून ती पुरवली जात नाही.  विशेषतः जेथे लवकर लग्न केले जाते त्यास देशांमध्येे - व शिक्षणाचा एकंदर प्रसार वाढल्यास जन्माच्या वेळीच होणारे बालकांचे मृत्यू किंवा त्यांना येणारे अपंगत्व रोखता येईल.

१) वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर होणार्या गर्भधारणेमुळे आई व तिच्याT मुलाच्याव आरोग्यास असणारे धोके वाढतात.

२) आई व मुलाचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता, दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असावे.

चार बाळंतपणांनंतर गर्भधारणा व मुलाच्या जन्मामधील धोका वाढतो.

३) कुटुंबनियोजनाच्या सोयी लोकांना मुलाच्या जन्माची वेळ, किती मुलांना जन्म द्यायचा आणि दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवायचे व मूल जन्माला घालण्यास पूर्णविराम केव्हा द्यायचा इ. बाबींबद्दल माहिती देतात. गर्भधारणा टाळण्याचे अनेक सुरक्षित व मान्यताप्राप्त उपाय आज उपलब्ध आहेत.

४) वयाच्या 18 व्या वर्षाआधी व 35 व्या वर्षानंतर होणार्या गर्भधारणेमुळे आई व मुलाचे आरोग्या स असलेले धोके वाढतात.

गर्भधारणा व मुलाच्या जन्माशी संबंधित समस्यांमुळे दरवर्षी सुमारे 515,000 स्त्रिया मृत्युमुखी पडतात. तर मरणार्या प्रत्येक स्त्रीमागे सुमारे 30 इतर स्त्रियांना गंभीर समस्या किंवा अपंगत्वास तोंड द्यावे लागते. असे मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना कुटुंबनियोजनाद्वारे टाळता येतात.

५) मुलगी किमान 18 वर्षांची होईपर्यंत पहिली गर्भधारणा होऊ न दिल्यास गर्भधारणा व बालकाचा जन्म सुरक्षित रीतीने होईल व जन्माला येणारे मूल कमी वजनाचे असण्याची शक्यता राहणार नाही. ज्या देशांमध्ये मुलीचे लग्न लवकर करून देण्याची पध्द त आढळते तिथे हे महत्वाचे आहे.

६) मुलगी किमान 18 वर्षांची होईपर्यंत गर्भधारणेसाठी तिचे शरीर तयार झालेले नसते. प्रौढ स्त्रीाच्या तुलनेत कमी वयाच्या मुलीस अपत्यजन्माची प्रक्रिया अत्यंत त्रासदायक व जोखमीची ठरते. शिवाय अगदी तरूण मातांना होणारी मुले पहिल्याच वर्षात दगावण्याची शक्यता देखील खूप असते. आई वयाने जितकी लहान, तितकाच तिला व तिच्या मुलाला असणारा धोका अधिक असतो.

७) तरूण मुलींना गर्भधारणा लांबवण्यासाठी विशेष मदतीची गरज असते. अशा तरूणींना व त्यांच्या कुटुंबियांना लवकर होणार्या बाळंतपणामधील धोके व ते टाळण्याच्या उपायांची माहिती देण्याित आली पाहिजे.

वयाच्या 35 वर्षांच्याक नंतर गर्भधारणा व अपत्य जन्मामधील धोके वाढण्याचस सुरूवात होते. एखाद्या स्त्रीचे वय 35 पेक्षा जास्त असेल व तिची चार किंवा अधिक बाळंतपणे झाली असल्यास त्यानंतरच्या गर्भधारणेमुळे तिला व त्या गर्भास गंभीर धोका असू शकतो.

८) आई व मुलाचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता दोन मुलांमध्ये किमान दोन वर्षांचे अंतर असावे. दोन मुलांमधील अंतर दोन वर्षांपेक्षा कमी असल्यास बालमृत्यूचे प्रमाण जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढते.

दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकाच्या आरोग्यास व वाढीस असलेला सर्वांत मोठा धोका म्हणजे नवीन बाळाचा जन्मक. कारण त्यामुळे ह्या पहिल्या बालकास मिळणारे आईचे दूध कमी होते किंवा थांबतेच. शिवाय त्याला आवश्यक असलेले विशेष अन्न तयार करण्यासाठी किंवा आजारपणामध्ये त्याची काळजी घेण्यासाठी आईला वेळच मिळत नाही. परिणामस्वीरूप, वयात दोन वर्षांपेक्षा अधिक अंतर असलेल्या सख्ख्या भावंडांच्या तुलनेमध्ये, पाठोपाठ जन्मलेल्या मुलांची शारीरीक किंवा मानसिक विकास पूर्ण होत नाही.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon