Link copied!
Sign in / Sign up
83
Shares

तापाची ५ लक्षणे ज्यामुळे बाळाची प्रकृती बिघडते

 

तान्ही बाळ ही आरोग्याच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात. त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना लगेच ताप, सर्दी, खोकला होतो. जर बाळ काहीच खात नसेल, रडतच आहे, अस्वस्थ आहे. तेव्हा त्याला कशाचे तरी दुखणे असेल. एखाद्या वेळी बाळ झोपेतून उठते तेव्हा त्याचे गाल लालसर होत असतील, शरीरातून उष्णता बाहेर पडत असेल, तेव्हा थर्मोमीटर घ्या आणि बाळाचे तापमान मोजा. जर बाळाचे अंग नॉर्मल पेक्षा खूपच गरम वाटत असेल तर तापाचे बाळाचे औषध असेल ते द्या. आणि घरात काही बाळाची औषधे आणून ठेवा. कारण बाळ रात्री- अप्रतिरी आजारी पडू शकते. खाली काही संकेत दिली आहेत ती तुम्ही बाळाला खूप ताप आल्यावर ओळखू शकता आणि त्यानुसार बाळाची काळजी घेता येईल.

१)   खूप अंग गरम झाले असेल तर

जर शरीराचे तापमान १००.४ F आणि ३८ अंश सेल्सिअस असेल तर ते नॉर्मल तापमान असते. आणि हेच लहान बाळालाही लागू होते. पण जर शरीराचे तापमान ३८ सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर बाळाला एकतर औषधाची नाहीतर डॉक्टरांची गरज लागते. पण बऱ्याचदा असे होते की, सकाळी बाळाचा ताप वाढतो व संध्याकाळी उतरून जातो. तेव्हा तापाची गोळी चमच्यात घेऊन तिच्यात पाणी मिसळून ते द्रावण बाळाला चमच्याने द्यावे. (गोळीचा मात्रा गोळीचा पाव भाग ) आणि गोळी देऊनही ताप उतरत नसेल तर डॉक्टरांशी बोलून घ्यावे.  

२) बाळाचे वर्तन विचित्र होणे

बाळ एकदम हेकटपणा करायला लागला किंवा एकदम शांत काहीच हालचाल नाही. खेळात नाही, खातही नाही. आणि त्याची झोपही पूर्ण होत नाही. तेव्हा ही तापाची लक्षणे असू शकतात.

३) फेफरे येणे

बाळ लहान आहे म्हटल्यावर आणि रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने तापामुळे त्याला फेफरे किंवा झटके येऊ शकतात.  

आणि असा झटका आल्यावर तो काही सेकंदासाठीच असतो. पण बाळाची प्रकृती बिघडू शकते. तेव्हा असे काही आढळून आल्यास डॉक्टरांशी बोलून घ्यावे.

४) काही लक्षणे

विविध शरीरातल्या लक्षणांमुळे बाळ आजारी पडते. त्यात मग तापाचाही समावेश होतो. जर बाळाचा कान सतत दुखत असेल, घसा दुखत असेल, पुरळ आले असतील, पोटदुखी असेल तर ह्यामुळे ताप होऊ शकतो. आणि ही बऱ्याचदा तापाचीच लक्षणे असतात. काही वेळा बाळ खूपच पाण्याची तहान लागतेय तेव्हा सावधपणे लक्ष द्या की, बाळाला ताप येऊ शकतो.

५) सतत उलट्या करत असेल

बाळाला काही पोटाच्या समस्या असतील आणि तो उलट्या करत आहे. तर त्याला ताप येतो. आणि त्याची अवस्था खूप बिघडते कारण बऱ्याचदा गोळीने ताप उतरत नाही. बाळाला श्वासही घेता येत नाही. अशावेळी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा.

शरीर हे इन्फेक्शन शी लढत असते म्हणू ताप होतो. आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून ही वाईट गोष्ट नाही. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तापला हलक्यापणाने घ्यायचे. असे नाही.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon