Link copied!
Sign in / Sign up
196
Shares

तुमच्या तान्ह्यासाठी काही खिचडीचे प्रकार

लहान बाळांना पचण्यासाठी व खूप आवडणारा आहार कोणता असा जर प्रश्न विचारला तर आई सांगणार की, खिचडी. हो खिचडी बाळांना खुप आवडत असते. आणि ती पचायला हलकी असल्याने बाळांना लवकर पचते आणि तिची चव सुद्धा चटपटीत असल्याने त्यांना ती आवडत असते. म्हणून तुमच्यासाठी पुन्हा एकदा खिचडीच्या विविध रेसिपीज घेऊन आलो आहोत कारण काही आईनी आम्हाला सांगितले की, खिचडीचे काही वेगळ्या पद्धती असतील तर आम्हाला सांगा. तेव्हा खाली दिलेल्या काही रेसिपीज.

१) सोपी खिचडी आणि पौष्टिक सुद्धा

* अगोदर तांदूळ घ्या पण तांदळाचे प्रमाण हे तुम्ही मूग, मूग डाळ, इतर डाळ ही घेऊ शकता आणि ही डाळ आणि तांदूळ सम प्रमाणात घ्या.

* गायीचे शुद्ध तूप घ्या आणि त्यावर मोहरी आणि जिरं घाला. त्यानंतर कढीपत्ता टाका. त्यात चमचाभर दही घाला.

* पाणी थोडंस जास्त टाका. चवीनुसार धणे-जिरे पूड आणि मीठ घाला. थोडे शेंगादाणे घाला. खात असतील तर थोडं

* तिखट किंवा काळा मसाला घाला. वरून कोथिंबीर घाला.

* शिजलेल्या खिचडीवर साजूक तूप घालून खायला द्या. ह्याच झालेल्या खिचडीमधून आवडीप्रमाणे भाज्या घालूनही खिचडी करू शकता.

२) पुलाव किंवा मिक्स खिचडी

* लांब तांदूळ तासभर आधी धुवून ठेवा. गाजर, फ्लॉवर, बटाटा, सिमला मिरची, फरसबी या किंवा आवडीप्रमाणे यापैकी कुठल्याही भाज्या शिवाय मटार घ्या.

* तूप गरम करा. त्यावर थोडा खडा गरम मसाला २मिरी, २लवंगा, २वेलच्या, १ तमालपत्र घाला. ते परतून भाज्या घाला. * भाज्या परतल्या की तांदूळ परता. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. शिजवा. आवडत असल्यास उतरवताना थोडं चीज किसून घाला. हा पुलाव डब्यात द्यायलाही उत्तम लागतो.

३) कॉर्न भात

* तांदूळ आणि उकडलेले कॉर्न दाणे समप्रमाणात घ्या. तुपावर थोडं जिरं घाला.

* एखादी कमी तिखट हिरवी मिरची मोठे तुकडे करून घाला. थोडंसं आलं किसून घाला. धुतलेले तांदूळ परता. नंतर त्यात कॉर्न दाणे घाला. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. थोडा लिंबाचा रस घाला. आणि शिजवून घ्या.

* यात हवं असल्यास किसलेलं गाजरही घालू शकता.

मटार भात

* तांदूळ आणि मटार समप्रमाणात घ्या. तेलावर कांदा परता. नंतर त्यात टोमॅटो घालून परता.

* मग मटार घालून चांगलं परता. धुतलेल्या तांदळाला थोडा काळा मसाला चोळून घ्या. आता त्यावर तांदूळ परता. दुप्पट पाणी घाला. थोडासा लिंबाचा रस आणि मीठ घाला. शिजवा. वरून खोबरं-कोथिंबीर घालून द्या. याच प्रकारे तोंडली भातही करता येतो.

* भाताचे हे प्रकारही मुलांना डब्यात देता येतील असे आहेत. हे सगळे पदार्थ मोठ्या माणसांना साध्या आजारांमध्ये द्यायलाही चालतील.

साभार - सायली राजाध्यक्ष

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon