Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

तंत्रज्ञानाच्या साह्याने अविवाहित मुलाच्या निधनानंतर मिळाले नातवंड

पुण्यात राहणाऱ्या राजश्री यांच्या २७ वर्षांचा अविवाहित मुलगा प्रथमेश पाटील यांचं सप्टेंबर२०१६ मध्ये कॅन्सरमुळे निधन झालं.प्रथमेश आणि त्याची धाकटी लहान बहीण यांचा प्रथमेश हाच एक आधार होता. पण त्याचा जाण्याने जणू त्यांचे आयुष्य जागच्या जागी थांबले.

प्रथमेश याने  पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर उच्चशिक्षणासाठी जर्मनीत गेला होता. पण २०१३ मध्ये प्रथमेशला कॅन्सर झाला. त्यानंतर तो भारतात परतला.  प्रथमेशचे कॅन्सरवरचे उपचार सुरू करण्यापूर्वी वीर्य जमा करून ठेवण्यास डॉक्टरांनी प्रथमेशला सांगितले होते.

 प्रथमेशचे प्रिझर्व्ह करून ठेवलेले वीर्य वापरून सरोगसीद्वारे दोन वर्षांपूर्वी वारलेल्या त्यांच्या अविवाहित मुलाची ही गोंडस मुलांचा जन्म झाला आणि हे केवळ शक्य झालं होतं ते आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे. या तंत्राच्या साह्याने राजश्री पाटील यांना मुलाच्या निधनानंतर दोन वर्षांनी १२ फेब्रुवारीला प्रथमेशच्या जुळ्या मुलांना जन्म देण्यात आला. या मुलांची नावं प्रथमेश आणि प्रिशा अशी ठेवली आहेत. अश्या प्रकारे तंत्रज्ञानाच्या साह्याने राजश्री पाटील यांना आपला मुलगाच जणू आपल्या नातवंडाच्या रूपाने पुन्हा मिळाला.

 (या लेखातील फोटो प्रतीकात्मक आहेत )

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon