Link copied!
Sign in / Sign up
151
Shares

तान्ह्या बाळांसाठी काही घरगुती उपाय

 

लहान मुलांना काही ना काही होताच असते. तेव्हा प्रत्येक वेळी डॉक्टरांना कडेही घेऊन जात येत नाही तेव्हा काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

डिकेमाली - दात येण्याच्या विकारांवर

१) जन्मजात बालकांमध्ये जन्मतः दात नसतात. दात येण्याची सुरुवात वयाच्या सहाव्या महिन्यानंतर होत असते. आणि जे दुधाचे दात असतात ते दोन वर्षापर्यंत क्रमाने येत असतात. दात हिरड्यातून बाहेर पडण्याने काळी उलट्या होणे, शौचास पातळ होणे, ताप येणे यांसारखी लक्षणे अनेक बाळांमध्ये आढळून येतात.

२) डिकेमाली हा विशिष्ट झाडापासून मिळणार डिंक आहे. याला वास फारसा चांगला नसतो. पण खूप लाभकारी आहे. त्यासाठी दररोज दिल्या जाणाऱ्या बाळगुटीमध्ये उगाळून डिकेमाली वापरली जाते. किंवा थोडीशी डिकेमाली पाण्यात विरघळवून ते पाणी बालकाच्या हिरडयांवर चोळले जाते. डिकेमाली जर ह्या प्रकारे नियमितपणे चालू असेल तर दात येण्याची क्रिया अगदी सुलभतेने घडते. आणि बालकास कोणताही त्रास होत नाही.

३) तसेच दातांमुळे जर बाळाला जुलाब होत असतील, उलट्या व पोटात दुखत असेल तर २५० मिलिग्रॅम डिकेमाली पाण्यात विरघळवून तीन वेळा द्यावी.

मातीखाणे साठी सोनकाव

१) अनेक लहान मुलांना माती खाण्याची सवय लागते. माती, भिंतीचे पोपडे, पेन्सिल, खडू, कोळसा आणि गर्भिण स्त्रियासुद्धा ही लक्षणे असतात. ह्याचे कारण शरीरातील लोह, कॅल्शिअम यांसारखे शरीरास आवश्यक असे क्षार कमी पडल्याने माती खाण्याची इच्छा उत्पन्न होते.

२) आणि ही माती खाण्याची सवय सहजासहजी सुटत नाही. ही सवय सुटण्यासाठी त्यांना विविध क्षार योग्य प्रमाणात मिळतील ह्याची काळजी घ्यावी लागेल. यादृष्टीने गेरू किंवा सोनकाव म्हटले जाते हा पदार्थ मुलांना खायला देऊ शकता. कमी अधिक सोनकाव खाल्ले तर बिघडत नाही. फक्त त्या मुलास शौच काळपट होतो. आणि काही दिवसातच माती खाण्याची सवय जाते.

चंदनबलालाक्षादि तेल

आपले मूल गुटगुटीत दिसावे, ते निरोगी रहावे अशी प्रत्येक मातापित्यांची इच्छा असते. ह्यासाठी भारतीय आई बाळाला दररोज अभयंग करणे, तेल चोळणे, टाळू भरणे, ह्या सर्व गोष्टी करत असते. साधे तेलही चालते पण जर चंदनबलालाक्षादि तेल  मिळालेच तर तेही तुम्ही लावू शकता आणि ५ वर्षेपर्यत अभयंग करू शकता.

 

             साभार- वैद्य य. गो. जोशी ( साधे उपाय सोपे उपाय )

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon