Link copied!
Sign in / Sign up
88
Shares

काळवंडलेल्या (टॅन) त्वचेसाठी काही घरगुती टिप्स

 

आजकाल घराबाहेर पडल्यावर प्रदूषण तसेच यामुळे त्वचा काळवंडते म्हणजेच टॅन होते. अशी टॅन झालेली त्वचा पुर्ववत होण्यासाठी किंवा त्वचा काळवंडू नये म्हणून काही घरगुती टिप्स देणार आहोत ज्या तुम्हांला त्वचा टॅन होऊ नये या करता उपयुक्त ठरतील

१. फळांचा पॅक 

केळे,सफरचंद आणि संत्रयाचे साल याचा लेप तयार करून चेहऱ्यावर लावा. २० ते ३० मिनिटे तो लेप तसाच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून टाका. केळे त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते. तर सफरचंद हे त्वचेचा टॅन झालेली त्वचा पूर्ववत करण्यास मदत करते तसेच त्वचेचा पोत सुधारते आणि संत्रे त्वचेतील आम्ल क्षारीय संतुलन साधण्यास मदत करते. पपईचा गरमध्ये दही आणि लिंबू रस घालून पॅक करून लावल्याने काळवंडलेली त्वचा पुर्ववत होते आणि मृत त्वचेचा थर काढून टाकते.

२. ताक आणि दलिया पॅक

ताकामध्ये तीन मोठे चमचे दलिया बारीक करून टाका. जो भाग टॅन झाला असेल त्या भागावर हा लेप लावा आणि हळू-हळू हलक्या हाताने मसाज करा. हा प्रयोग आठ्वड्यातून दोनदा करा. ताक आणि दलिया त्वचेचा टॅन कमी करते.आणि यामुळे त्वचा तरुण राहते.

३. कोरफड आणि टरबुजाचे टोनर

कोरफडचा गर हा त्वचेला लावल्यावर त्वचा मऊ होतेच आणि कोरफडीमुळे त्वचेवरचे डाग आणि काळवंडलेली त्वचा हे कमी होतात. कोरफड ही त्वचेमध्ये थंडावा आणणारी वनस्पती आहे.त्यामुळे ऊन्हामुळे त्वचेबाबत निर्माण होणाऱ्या सर्व समस्या कोरफडीच्या वापरानेकमी होतात. टरबूजच्या रसाचा वापर टोनर म्हणून करण्यात येतो तरबूज़ के रस का टरबूज उन्हामुळे येणारे फोड पुटकुळ्या कमी करतो. टरबूजच्या रसाच्या वापराने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेतील ओलावा कायम राहतो. आणि उन्हात फिरताना याचा उपयोग त्वचेला होतो

४. शहाळ्याचे पाणी /नारळाचे पाणी आणि चंदन

एक चमचा नारळ पाण्यामध्ये एक चमचा चंदन पावडर टाका आणि हे मिश्रण चेहऱ्यावर आणि टॅन झालेल्या भागावर लावा. वाळे पर्यंत हा पॅक असाच राहू द्या आणि नंतर साध्य पाण्याने धुवा. या पॅक मध्ये तुम्ही काही थेंब बदामाचे तेल देखील टाकू शकता बदामाचे तेल टाकल्यावर हा पार्क मानेल हाताला चेहऱ्याला लावा आणि वाळल्यावर पाण्याने धुवा. चंदनाचा आणि नारळाच्या पाण्याचा थंडावा हा तुमच्या त्वचेचा टॅन घालवतो आणि त्वचेत थंडावा निर्माण करून त्वचेचा पोत सुधारतो

५. मध आणि अननस पॅक

अननसाचा गर आणि दोन चमचे मध एकत्र करून फेसपॅक बनवा यात गाठी राहू देउ नका हा लेप १०-१५ मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर धुवून टाका. जर हा लेप एक दिवसाआड लावला तर त्वचेत लवकरात-लवकर फरक जाणवू लागेल. यामुळे त्वचेचे काळवंडलेपण कमी होईल आणि त्वचा तजेलदार बनेल 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon