Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

तुम्हाला पडत असलेल्या स्वप्नांचा अर्थ काय ?

आपल्याला स्वप्ने का पडतात?

अनेक दशकांच्या संशोधनानंतरही आपल्याला स्वप्ने का पडतात, याविषयी अभ्यास चालू आहे. पुष्कळदा स्वप्ने आपल्या झोपेच्या REM टप्प्यात पडतात; जेव्हा नुकतीच आपल्याला गाढ झोप चालू झालेली असते. नंतरच्या REM च्या टप्प्यांत (उदा. टप्पा ४) पडणारी स्वप्ने आपल्याला स्पष्टपणे लक्षात राहतात. झोपेचे विकार किंवा अयोग्य झोपेच्या वेळी यांमुळे नकारात्मक स्वप्ने पडू शकतात.

येथे तुम्हाला सामान्यतः पडणारी स्वप्ने आणि त्यांचा अर्थ काय आहे; हे आम्ही देत आहोत

१) हरवलेले असणे वा उशिरा पोहोचणे

अनेकांना आपण हरवले गेल्याचे स्वप्न पडत असते. याचा अर्थ म्हणजे तुम्ही ओळखीच्याच एका ठिकाणी कसेतरी हरवले गेले असता; वा तुम्ही एका नव्याच प्रदेशात आलेले असता. उशिरा पोहोचलेले असणे हेदेखील एक सामान्यतः पडणारे स्वप्न आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे, गोष्टी योग्य प्रकारे आणि योग्य वेळेवर करण्यात तुमचा स्वतःवर विश्वास नसतो.

२) डोंगरावरून कोसळणे

कधी आकाशातून कोसळत असल्याचे स्वप्न पडले आहे काय? किंवा बेडवरून? किंवा डोंगरकड्यावरून? किंवा इमारतीवरून? आपल्या सर्वांना असे स्वप्न कधी ना कधी पडलेले असते. कधीकधी आपण जमिनीवर पोहोचल्यावर दचकून उठतो आणि कधीकधी आपण कोसळतच राहतो. स्वप्नामध्ये कोसळत राहणे याचा अर्थ म्हणजे तुमच्या भूतकाळात अशी गोष्ट घडलेली आहे, ज्याविषयी विचार करत बसणे तुम्ही सोडून दिले पाहिजे.

३) गरोदर राहणे

गरोदर असल्याचे स्वप्न पडणे म्हणजे एकतर तुम्ही खरोखरच गरोदर आहात; वा तुम्हाला खरेच गरोदर व्हायची इच्छा आहे. याचा असाही अर्थ होतो की, तुमचा व्यक्ती म्हणून विकास होत आहे आणि तुम्हाला तुमची कौशल्ये अजून विकसित करण्याची गरज आहे.

४) सार्वजनिक ठिकाणी नग्न असणे

हे स्वप्न उलगडण्यास सोपे आहे. सार्वजनिक ठिकाणी नग्न असण्याबाबत अर्थातच आपल्या सर्वांना भीती असते आणि याबाबतचे स्वप्न म्हणजे, तुम्हाला स्वतःला लाजिरवाणे वाटून घेण्यात वा फजिती करून घेण्यात खूपच भीती वाटते. याबाबत तुम्ही काळजीत असाल. ह्या स्वप्नाचा असाही अर्थ होतो की, तुम्हाला लोकांसमोर खुलेपणाने वागण्यास भीती वाटते.

५) राक्षस किंवा भूत येणे

जर तुम्हाला स्वप्नामध्ये राक्षस दिसत असतील; तर त्याचा अर्थ म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे काही घटक तुम्हाला बदलायची इच्छा आहे. पण जर तुम्हीच तुमच्या स्वप्नातील राक्षस वा हिंस्र प्राणी असाल; तर त्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला काय बदलायचेय हे तुम्हाला शोधून काढायची गरज आहे आणि ते तुम्हाला तात्काळ बदलायचे आहे.

६) आपला कुणीतरी पाठलाग करणे

जर तुमचा कोणी पाठलाग करत असेल; तर याचा अर्थ तुम्ही भरपूर ताणतणावाखाली आहात. याचा असाही अर्थ होतो की, तुम्हाला कशाचा तरी धोका वाटत आहे. तुम्हाला नेमका कशाचा सर्वाधिक ताण पडत आहे, हे शोधून काढा आणि त्यावर उपाय योजा.

७) स्वप्नात बाळ येणे

बाळांविषयीचे स्वप्न याचाच अर्थ म्हणजे, तुम्ही तुमच्या परिवाराविषयी विचार करत आहात आणि तुम्हाला तुमच्या बाळाला ज्ञान देण्याची इच्छा आहे. याचा असाही अर्थ होतो की, तुम्ही भूतकाळातील कोणत्यातरी गोष्टीबाबत विचार करीत आहात.

८) अडकलेले असणे

जर तुम्हाला अडकलेले असल्याचे वाटते; तर त्याचा अर्थ तुम्हाला विश्रांती हवीय वा एक नवीनच सुरुवात हवीय. एक नवीन नोकरी घेण्याचा किंवा जर करीत नसल्यास सुरू करण्याचा विचार करा. जर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये समाधानी असाल; तर मग तुम्हाला फक्त एका सुट्टीची गरज आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon