Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

सुंता करण्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

 

 

              सुंता करणे म्हणजे पुरुषांच्या जननेंद्रियावर असणारी जास्तीची त्वचा काढून टाकणे. ही प्रक्रिया शस्त्रक्रिया करून केली जाते. आपल्याकडे ही पद्दत नाही पण ह्याविषयी जाणून घेणेही महत्वाचे आहे. जू, इस्लाम धर्मीयांमध्ये ह्या गोष्टीला खूप धार्मिक महत्व आहे. त्यामुळे या धर्मांमध्ये मुलगा जन्माला आल्यावर त्याची सुंता केली जाते. युनाइटेड स्टेट्स, कॅनडा, आफ्रिका व मिडल ईस्ट येथे धार्मिक कार्य न मानता सुंता करणे ही पद्धत रूढ आहे. परंतु आशिया, युरोप, मध्य अमेरिका, साऊथ आफ्रिका या ठिकाणी सुंता प्रक्रिया रूढ झालेली नाही. धार्मिक, सामाजिक किंवा स्वछतेच्या कारणांसाठी पालक आपल्या मुलाची सुंता करण्याचा निर्णय घेतात. परंतु हा निर्णय घेणे खूपच कठीण असते. आम्ही सुंता कारण्याच्या प्रक्रियेचे होणारे फायदे व तोटे या लेखात मांडत आहोत.

सुंता करण्याचे फायदे

१. सुंता केल्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन यापासून बाळाचा (मुलाचा) बचाव होण्यास मदत होते.

२. एस टी डी, एच आय व्ही यांसारख्या रोगांपासून बचाव होण्यास मदत होते. परंतु सुंता केल्याने हे रोग होणारच नाहीत. अशी काही पाश्चिमात्य देशातील लोकांची समजूत आहे. 

३. सुंता केल्याने पुरुषांच्या जननेंद्रियाच्या धोका कमी होण्यास मदत होते.

४. फिमोसिस, पॅराफिमोसिस, बॅलनिटीस यापासून बचाव होतो.  

५. सुंता केल्याने जननेंद्रिय स्वच्छता राखण्यास मदत होते.

६. सुंता केल्याने घरातील पुरुषांप्रमाणेच बाळ (मुलगा) दिसून येतो. इतरांप्रमाणेच तो दिसू लागतो. त्यांना वेगळेपणाची भावना येत नाही.

सुंता करण्याचे तोटे

१. काही वेळा शस्त्रक्रिया केल्यामुळे संसर्गबाधा निर्माण होऊ शकते. किंवा इतर शरष्क्रियेशी निगडित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

२. सुंता करण्याची शस्त्रक्रिया करताना शारीरिक दुखापत होते. डॉक्टर ऍनेसेशिया देऊन दुखापत कमी करण्याचा प्रयत्न करतात.

३.  काही वेळा ऍनेसेशिया घटक ठरू शकतो. ऍनेसेशिया चे  कमी जास्त प्रमाण प्राणघातक ठरू शकते.

४. या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च तुमचं तुम्हालाच करावं लागतो. त्यासाठी कोणतीही  इन्शुरन्स पॉलिसी नाही.

५. बाळाच्या पहिल्या महिन्यातच तुमहाला सुंता करायची कि नाही हा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास पुढील महिन्यांमध्ये नक्कीच ऍनेसेशिया द्यावा लागतो. त्याने समस्या उद्भवू शकतात.

६. काही लोकांच्या मते सुंता करणे म्हणजे शरीराला त्रास देणे होय.

तुम्ही तुमच्या बाळाची सुंता करण्याचा निर्णय घेतलात किंवा नाही घेतलात तरी गुप्त अंगाची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही जर निर्णय घेऊन सुंता करण्यासाठी बाळाला नेट असाल त्या वेळी ती जागा स्वच्छ असणे महत्वाचे आहे. साबणाच्या पाण्याने किंवा कोमट पाण्याचा वापर त्यासाठी करा. डायपर वाईप्स वापरणे टाळा. सुंता केल्यावर प्रत्येक अंघोळीच्या वेळी शस्त्रक्रिया केलेली जागा कोमट पाण्याने धुवून घेणे फायद्याचे ठरेल.




Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon