Link copied!
Sign in / Sign up
54
Shares

सुंदर आणि देखण्या होण्यासाठी घरगुती उपाय करून बघाच

सौंदर्य प्रत्येकालाच आवडत असते. काहींना स्वतः सुंदर राहायला आवडते. त्यात काही चुकीचे नाही. उलट ते स्वतःला परिपूर्ण करण्याची निशाणी आहे. आणि सुंदरता ही तुमच्या व्यक्तिमत्वचा पैलू आहे. सुंदरता ही तुम्ही गोऱ्या आहात. ह्यावर नसते. तर तुम्ही काळ्या असा की गोऱ्या पण तुमच्या चेहऱयावर एक लय, ताल म्हणजे एक फ्रेशनेस असतो चेहऱ्यावर. बघितल्यावर छान वाटते. गोरे असणे सुंदरता नाहीच. उलट आपल्या प्राचीन काळातील द्रौपदी, राधा ह्या गोऱ्या नव्हत्या. तर त्या देखण्या होत्या. तेव्हा देखणी स्त्री होण्यासाठी काय करणार त्याविषयी हा ब्लॉग.

१) लिंबू खूप प्रमाणात आपल्या घरात उपलब्ध असतात. त्या लिंबाच्या साली सुकुवून घ्याव्यात. आणि त्यानंतर त्यांना चांगले पावडर सारखे वाटून घ्यायचे. मग त्यानंतर त्या पावडरमध्ये काही प्रमाणात दूध आणि हळद मिसळून घ्यावी. आणि रोज चेहऱ्याला लावावी. वाटल्यास तुम्ही त्याची दररोज चेहऱ्याला लावण्यासाठी पावडर तयार करू शकतात. (दररोज लावत चला)

२) ४ चमचा दही घेऊन दहीमध्ये एक चमचा कोको पावडर मिसळावे. आणि त्यात मध टाकून ते मिश्रण घुसळून चेहऱ्यावर लावावे. आणि २० मिनिटांनी तो चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा. आणि असे केल्याने चेहरा उजळतो.

३) टमाटे ज्यावेळी तुमच्या घरात असतील तेव्हा त्यांना चेहऱ्यावर लावत जा त्याच्याने चेहऱ्याला चमक येते आणि त्यासोबत काकडी असेल तर काकडीही चेहऱ्यावर लावू शकता.

४) तुम्ही अंडे खात नसाल पण अंड्याचा उपयोग सौंदर्यासाठी होत असतो. त्यासाठी अंडयांचा बलक, आणि १ ते २ चमचा नारळाचे पाणी एकत्र करून त्यात ओटमील घालून मिश्रण ढवळून त्याची पेस्ट बनवावी. आणि ती पेस्ट चेहऱ्यावर आणि काळ्या डागावर लावावी. २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील काळसर पण व काळे डाग निघून जातात.

तर देखणे व सुंदर होण्यासाठी ह्या घरगुती उपाय तुम्ही खूप साधेपणाने करू शकता. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon