Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

उन्हामुळे त्वचेला होणाऱ्या सनबर्न वरील घरगुती उपाय.


सूर्याच्या प्रखर उन्हामुळे त्वचेची जळजळ होते. लहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे संवेदनशील असते आणि उन्हामुळे सनबर्न होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा आपण घराबाहेरील कामे करतो. उन्हाळ्यात तर दिवसा घराबाहेर पडणे म्हणजे तर त्वचेची लाहीलाही होते. लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील उन्हामुळे हा त्रास होतो. त्वचा काळी पडणे, त्वचेची जळजळ होणे यामुळे उन्हाळ्यात सगळ्यांनाच त्रास होतो. सनबर्न दोन टप्प्यात घडते, केवळ १०-१५ मिनिटे ऊन लागल्यास देखील हे होऊ शकते. या गोष्टीची सगळ्यांनी लक्षपूर्वक काळजी घ्यायला हवी. कारण जास्त काळ उन्हाशी संपर्क आल्यास त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो.

सनबर्नवर वयानुसार उपचार केले जातात. १२ महिन्यापेक्षा कमी वयाचे बाळ असेल तर त्याला तात्काळ उपचारांची गरज असते. डॉक्टरांकडून तपासणी करून सनबर्नच्या तीव्रतेनुसार औषधी दिली जातात. उन्हामुळे होणाऱ्या या कंडीशन सोबत जर मळमळ आणि उलट्या देखील असतील तर त्वरित डॉक्टरांना दाखवा

१. सनबर्न कसे होते ?

उन्हाळ्यात सूर्याची किरणे तीव्र असतात. सनटॅन शरीराला एक संरक्षण देते, पण जेंव्हा सूर्याची प्रखर किरणे त्वचेच्या नाजूक पेशींवर जास्त होतात तेंव्हा सनबर्न होते. आपल्या शरीरात एक नैसर्गिक सनस्क्रीन असते, त्यास मिलेनीन असे म्हणतात. मिलेनीन ची साठवण जास्त प्रमाणात झाल्यास सनबर्न होते. त्वचेतील जिवंत पेशींना सनबर्नमुळे इजा होते आणि यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी मुलांसोबत घराबाहेर पडताना नेहेमी सनस्क्रीन जरूर लावा.

सनबर्नचा पहिला टप्पा.

सनबर्नच्या पहिल्या टप्प्यात त्वचा लाल होणे आणि सुजणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे बरी होण्यास २ ते ५ दिवस लागतात. त्वचेला ओलावा मिळाल्यास हे लवकर बरे होते. माॅईश्चराईजर आणि हायड्रेशनमुळे त्वचा लवकर पूर्ववत होते.

सनबर्नचा दुसरा टप्पा.

दुसऱ्या टप्प्यात सूज येणे, त्वचा लाल होणे, आणि लाल झालेला भाग दुखणे अशी लक्षणे असतात. यावेळी खास काळजी घेणे गरजेचे असते. त्वचेवर पुटकुळे येणे हे देखील सनबर्नच्या दुसऱ्या टप्प्याचे लक्षण आहे. हे बारीक बारीक पूटकुळे त्वचेचे रक्षण करतात. जळजळ होणे आणि लाल त्वचा पडणे यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा. 

सनबर्नसाठी प्रथमोपचार.

सनबर्नवर काही घरगुती उपाय करण्या आधी त्यावर प्रथमोपचार करणे गरजेचे असते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत बाहेर गावी असाल किंवा घरापासून दूर असाल तर हे प्रथमोपचार त्यावर बँडेज सारखे काम करतील. सनबर्नने बाळाच्या त्वचेवर पुटकुळ्या आल्या असतील तर त्या अजिबात फुटू देऊ नका.

अजून एक उपाय म्हणजे जिथे इजा झाली आहे तिथे एक टॉवेल थंड पाण्यात ओला करून लावा. त्या जागेस थंड टॉवेलने भिजवा. सनबर्न झाल्यास सहसा मुलांना शरीरात पाण्याची कमतरता देखील झालेली असते. त्यामुळे त्यांना द्रव जास्त द्या. पाणी आणि फाॅर्मुलाचे दुध दिल्यास डीहायड्रेशन कमी होण्यास मदत होईल. त्वचेचा ओलावा कमी करण्यास कोरफडीचे माॅईश्चराईजर लावा म्हणजे बाळाल खाज किंवा जळजळ होणार नाही. वॅसलीन सारखे पेट्रोलियम जेल लावणे टाळा. यामुळे जळजळ अजून वाढेल.

जर सनबर्नमुळे त्वचा लालसर झाली असेल तर काळजी करण्याचे जास्त कारण नाही. परंतु जर त्वचेवर पुटकुळ्या येण्यास सुरवात झाली असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.

सनबर्नसाठीचे उपचार तुमच्या घरातच आहेत.

आपल्या घरात असणाऱ्या अनेक गोष्टींचा वापर कसा करायचा याविषयी आपल्याला पुरेसे ज्ञान बर्याचदा नसते. जर सनबर्न झाला असेल तर तुमच्या घरातल्याच काही गोष्टी तुमच्या उपयोगी येऊ शकतात. खाली दिलेल्या काही टिप्स तुम्ही वापरल्या तर तुमचे काम सोपे होऊ शकते.

१. ओट्स.

स्वयंपाकघरात नेहेमी असणारी एक गोष्ट म्हणजे ओट्स. तुम्ही सकाळी नाश्ता करता ते ओट्स तुम्हाला सनबर्नसाठी उपयोगी पडू शकतात. बाळाच्या अंघोळीच्या पाण्यात एक कपभर ओट्स टाका. बाळाला जितक्या वेळ ओट्सच्या पाण्यात बसायचे आहे तितक्या वेळ बसू द्या. ओट्स सनबर्न कमी करण्यास उपयोगी असतात. ओट्समुळे वेदना शमतात. त्वचेला थंड वाटते.

यावर दुसरा उपाय म्हणून कोमट पाण्याने अंघोळ घालावी. थंड पाण्याने अंघोळ केल्यास अजूनच चांगले. अंघोळीनंतर बाळाचे शरीर लगेच टॉवेलने पुसून घेऊ नका. अलगद कापडाने पाणी शोषून घ्या. आणि माॅईश्चराईजर लावा.

२. बर्फ.

बर्फ त्वचेवर लावल्याने वेदना आणि लालसरपणा लवकर कमी होतो. बर्फ कापडात गुंडाळून त्वचेवर हळू हळू चोळा. बर्फ लावतांना डायरेक्ट त्वचेवर लावू नका, यामुळे वेदना वाढून फ्रोस्टबाईट होऊ शकते. बर्फाने जळजळ कमी होईल.

३. कोरफड.

कोरफड हा सनबर्नवरील सर्वात लोकप्रिय असा नैसर्गिक उपाय आहे. तुम्ही कोरफडीच्या पानातून त्याचा गर काढून तो डायरेक्टली बाळाच्या त्वचेवर लावू शकता. याने त्वचेला आराम मिळेल आणि सनबर्न लवकर बरे होईल.

४. दही.

तुम्ही दही आणि नारळाचे तेल एकत्र करून इजा झालेल्या त्वचेवर लावू शकता. दह्यात कोरफडीचे जेल लावल्यास उत्तम. याने त्वचेला ओलावा मिळून त्वचेवरील जळजळ करणारी छिद्रे बंद होतात. थंड दही घ्या, त्यात नारळाचे तेल मिसळून त्वचेवर लावा. आणि थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवा. दह्यात प्रोबायोटिक्स असतात. त्वचेचा ह्रास भरून काढण्यासाठी हे मदत करतात. दह्याने बाळाच्या त्वचेवर एक थर तयार होईल जो सनबर्नला लवकर बरे करेल.

५. दुध.

दुध देखील सनबर्न बरे करण्यासाठी सोप्पा उपाय आहे. दुधामधील फॅट आणि प्रोटीन इजा झालेल्या त्वचेवर संरक्षक थर निर्माण करतात. तुम्ही थंड दुध सनबर्न वर लावू शकता. याने थंडावा येईल आणि अजून नुकसानीपासून त्वचा वाचेल.

६. कच्चा मध.

कच्चा मध औषधी असतो. मधात अॅन्टिसेफ्टीक असल्यामुळे उन्हाने जळलेल्या त्वचेवर याचा परिणाम लवकर होतो. सनबर्न झालेल्या ठिकाणी कच्चा मध लावून ठेवा आणि थोड्यावेळाने धुवून टाका. मधाचा वापर माॅईश्चराईजर सारखा देखील करता येतो.

७. बटाटा.

बटाटा उकडून घ्या आणि त्याला थंड झाल्यावर कुस्करून सनबर्नवर लावा. बटाटा त्वचेतील ओलावा कमी न करता उष्णता शोषून घेतो. काळे डाग जाण्यासाठी देखील बटाटा उपयोगी असतो. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. बटाटा लावल्यास १०-१५ मिनिटांनी धुवून टाका.

८. साबणाचे पाणी वापरू नका.

बाळाला जर सनबर्न झाले असेल तर त्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी त्याला साबणापासून दूर ठेवा. साबणामुळे जळजळ वाढू शकते. साबण त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी करते आणि त्याने त्वचेतील ओलावा कमी होतो परिणामी त्वचा कोरडी पडते. साबणाऐवजी दुसऱ्या थंडावा देणाऱ्या गोष्टींवर अवलंबून राहा. बबल बाथ सुद्धा यात टाळा.

 सनबर्न होऊ नये म्हणून मुलांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात घराबाहेर खेळू देऊ नका. या वेळात सूर्यकिरणे प्रखर असतात. मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे ते यास लवकर बळी पडतात. सनस्क्रीन लावायला देखील विसरू नका. SPF30 चे सनस्क्रीन लावूनच मुलांना बाहेर पाठवा.          

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon