Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

वाढता स्थूलपणा गरोदर राहण्यास ठरू शकतो अडथळा

हल्ली महिलांमधील स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे आणि ही गोष्ट गरोदर राहण्यास अडथळा बनत आहे.स्थूलपणामुळे स्त्रीच्या ओव्हूलेशन व गर्भधारणेसाठी आवश्यक असणा-या हॉर्मोन्सचा पॅटर्न बदलून दिवस राहण्यास अडथळा निर्माण होतो. स्थूलपणामुळे पोटाच्या भागात चरबी साठल्याने मासिक पाळी अनियमित होते व ओव्हूलेशनच्या होण्यास अडथळा येतो आणि त्यामुळे अनेकवेळा प्रयन्त करून गर्भ राहण्यास अडचणी निर्माण होतात. 

१. पीसीओएस होण्याची शक्यता जास्त असते. 

      स्थूलपणामुळे पॉलीस्टीक ओव्हेरीयन सिन्ड्रोम(पीसीओएस)होण्याची शक्यता असते.या स्थितीमुळे स्त्रीची मासिक पाळी अनियमित होते,ओव्हूलेशन होणे कमी अथवा बंद होते आणि शरीरातील पुरुष संप्रेकाराची (हॉर्मोन्सची) पातळी वाढते.

२.  इतर आरोग्य समस्या 

स्थूल व्यक्तींना उच्च रक्तदाब,मधूमेह,रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक असणे अशा अनेक आरोग्य समस्या असतात आणि  या आरोग्य समस्यांमुळे स्त्रीला  गर्भाधारणेमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.

३. गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते

काही स्थूल महिला या स्थूल असून देखील त्यांना गर्भधारणा होण्यात यशस्वी झाला तर त्यांच्या स्थूलपणामुळे  बाळाचे पोषण करण्यात अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे गर्भपात होण्याचे शक्यता अधिक असते शकतो आणि त्यानंतर पुन्हा गर्भधारणा होणे कठीण असते

४. इतर प्रकारे गर्भधारण होण्यास अडचणी

जर इतर कोणत्या प्रकारांनी गर्भधारणा होण्यास जर अडचणी येत असतील आणि तुम्ही गर्भधारणेसाठी जर आय व्ही एफ सारख्या पर्यायांचा वापर करत असाल तर त्यात देखील स्थूलपणामुळे अडचणी येऊ शकतात.

 स्थूलपणा कमी करण्यासाठी काही साधारण उपाय 

ज्यावेळी मुलाचा विचार कराल त्यावेळी तुम्ही तुमचे वजनाच्या  बाबतीत जागरूक असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमची प्रकृती स्थूल असेल तर पुढील काही सध्या उपायांनी या समस्यांवर  मात करू शकता 

१. जीवनशैलीमध्ये बदल 

 आजकालची जीवनशैली ही  फार धावपळीची झाली आहे. या जीवनशैलीत वेळत जेवणे, वेळात झोपणे, योग्य आहार घेणे. व्यायाम करणे.

२. जंक फूड टाळा आणि पोषक आहार 
 

 

स्थूलपणा कमी करण्यासाठी जंक फूड खाणे टाळा आणि घराचा पोषक आहार घ्या. या आहारात सर्व प्रकारच्या जीवनसत्वाचा समावेश होईल असा आहार घ्या. सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण नियमितपणे जेवा. 
३. व्यायाम 

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची गरज असते. त्यामुळे आळशीपणा न करता नियमित व्यायाम करा. 

४. व्यसने सोडा. 

जर तुम्हाला धुम्रपान व मद्यपानाचे व्यसन असेल तर तुम्हाला गर्भधारणेमध्ये समस्या येऊ शकतात. यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापुर्वीच ही व्यसने सो़डून द्या. 

त्यामुळे गरोदर राहण्यासाठी स्थूलपणा टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon