Link copied!
Sign in / Sign up
70
Shares

जाणून घ्या स्त्रियांसाठी शतावरी कशी उपयुक्त असते.

       शतावरीला आयुर्वेदामध्ये बहुगुणी मानण्यात येते. संस्कृतमध्ये नारायणी तर शास्त्रीय नाव ॲस्पॅरेगस रेसिमोससAsparagus racemosus हे आहे. ही एक पर्णहीन, काटेरी वेल आहे. या वेलीच्या खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. ही वनस्पती Liliaceae या कुटुंबातील आहे. शतावरी ही मूळची भारतीय असून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात समुद्रसपाटीपासून ४००० फूट उंचीपर्यत सर्व देशभर वाढताना दिसते. भारतात सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगांत व कोकणात शतावरीच्या वेली खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर तसेच जंगलातही आढळतात. शतावरीचा आणखी एक प्रकार आहे. त्याला भाजीची शतावरी असे म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव Asparagus officinalis असे आहे.

 याचे कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे. शतावरीची मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झुपक्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या फुटतात साधारणतः १०० मुळ्या एकावेळी फुटल्यामुळे तिला शतावरी असे नाव पडले आहे. मुळांच्या वर पातळ करडय़ा रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो. मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो.

शतावरीचे आरोग्यदायी फायदे

आयुर्वेदामध्ये शतावरीला स्त्रियांसाठी शक्तीवर्धक औषध मानले आहे. कारण, यामुळे स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर प्रभाव पडतो.

मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि मोनोपॉजनंतरचा त्रास कमी करण्यास शतावरी मदत करते. 

स्तनपान देणाऱ्या मातांचे दूध वाढण्यासाठीही शतावरी उपयुक्त आहे.

 शतावरी पाचक, अँटी-युक्लीअर, अँटी-ऑक्सिडंट व अँटी-कँसर घटक म्हणूनही काम करते. 

शतावरी यकृताचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बाजवते असे सिद्ध झाले आहे 

शतावरी कल्प नामक औषधामध्ये शतावरी हा प्रमुख घटक असतो. परंतु हे औषध वैद्यकीय सल्यानुसार घ्यावे.

शतावरीचे दुष्परिणाम

हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्यसाठी शतावरीचे सेवन त्रासदायक ठरू शकते. इतर सगळ्यांसाठी शतावरी सुरक्षित मानली जाते. 

वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी शक्यतो शतावरीचे सेवन कमी प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. 

अस्पॅरॅगसची अॅलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीचे सेवन केल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचे सेवन करणे टाळावे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon