Link copied!
Sign in / Sign up
92
Shares

काही स्त्रियांमध्ये गर्भ का राहत नाही?


जर तुम्हाला काही मानसिक ताण -तणाव असेल, हाइपो किंवा हाइपर थाइरोइडिज़्म, वजन वाढणे किंवा एकदम कमी होणे, किंवा PCOS असेल तर तुमच्या सेक्स हार्मोनवर ह्याचा प्रभाव पडू शकतो. एखाद्यावेळी तुमचा नवरा खूप दिवसापासून मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करत असेल तर त्यामुळेही शुक्राणू प्रभावित होऊन त्याचा परिणाम गरोदर न होण्यात होत असतो. आणि व्हिटॅमिन ड चा खुराक कमी असेल किंवा ह्या जीवनसत्वाची कमी असेल तर स्त्रीला गरोदर व्हायला अडचण येत असते.

१) तुम्ही बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केव्हापासून करत आहात ?

तुम्ही गरोदर राहत नसाल तर लगेच घाबरून जाऊ नका. तर तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण प्रत्येक महिन्यात गरोदर होण्याचा १०० टक्के चान्स असतो आणि जर काही अडचण असेल स्त्रीमध्ये किंवा पुरुषात तरीही प्रत्येक महिन्यात २५ टक्के तरी चान्स असतो. म्हणून तुम्ही गरोदर थोड्या कालावधीनंतर होऊ शकता आणि आपण आपल्या आजूबाजूचा काही नातेवाईकांमध्ये, गावात, इतर जोडप्याना बघतो तेव्हा लक्षात येते की, त्यांनीही उशिराच बाळाला जन्म दिला आहे. तेव्हा घाबरून जाऊ नका. तुम्ही गरोदर नक्कीच होणार.

२) गरोदर न होण्यात महत्वाचे कारण

सर्व व्यक्तीच्या जीवनातला सर्वात मोठा दुष्मन हा मानसिक ताण तणाव आहे. आणि विशेषतः गरोदर स्त्रीसाठी जास्त आहे.

फर्टिलिटी बाबत खूप संशोधनात असे आढळून आले आहे की, सर्व रिपोर्ट नॉर्मल असताना गरोदर न होण्याचे कारण हे मानसिक ताणच आहे. बऱ्याचदा लग्न झाल्यावर लगेच बाळ पाहिजे ह्याचाही तणाव त्या स्त्रीवर असतो.

३) थायरॉईड

१. ज्या स्त्रियांना हाइपो ते हाइपर थाइरोइडिज़्म असते. त्यांना रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन बॅलेन्स करण्यात अडचण येत असते. थारॉईड डिसऑर्डर तुमच्या मासिक पाळीला अनियिमीत करत असतो. जसे की, कधीही मासिक पाळी येणे, मासिक पाळीत खूप रक्त निघणे अशी कारणे.

२. थॉराईडची लेव्हल कमी व्हायला कारण आहे तुमचे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मध्ये सेक्रीशिन होऊन तुम्हाला ओवरियन सिस्ट होऊ शकतो. आणि त्यामुळेही गर्भ राहत नाही.

४) वजन

वजन एकदम खूप वाढणे किंवा एकदम घटून जाणे ह्यामुळे समस्या निर्माण होत असते. आई व्हायला अडचण येते कारण स्त्रीमध्ये असणारे हाइपोथैलेमस मध्ये समस्या येऊन त्यांना अमेनोर्र्होई(amenorrhoea) ह्याचाही धोका असतो. आणि खूप वजनामुळे एस्ट्राडिओल काम करत नाही.

५) PCOS

जर स्त्रीला पोलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम या PCOS असेल तर आई बनण्याचे चान्सेस खूप कमी होऊ शकतात. ज्या स्त्रियांना pcos आहे तर त्यांची मेल (पुरुष) हार्मोनची मात्रा नॉर्मल लेव्हल पेक्षा जास्त असते. खासकरून टेस्टोस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन ची मात्रा कमी असल्याने एग फ़ोलिक्सचा विकास होत नाही. आणि त्यामुळे गरोदर होत नाहीत.

६) काही वेगळी कारणे

१. जर तुमचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि १ - २ वर्ष खूप प्रयत्न करून गर्भ राहत नसेल तर डॉक्टरांना भेटून व्यवस्थित कारण जाणून घ्या.

२. तुमच्या पतीच्या शुक्राणूत काही समस्या असेल त्यामुळेही गर्भ राहत नाही.

३. दोन्हींना जोडीदारात पुरुष किंवा स्त्रियांना समागम करण्यात रस नसेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon