Link copied!
Sign in / Sign up
28
Shares

स्त्रियांमध्ये आढळणारे PMS म्हणजे काय?

पीएमएस म्हणजे काय ?

अनेकदा मुलींना किंवा इतर वयातील महिलांना देखील पाळी यायच्या काही दिवस आधी चिडताना, रागावताना किंवा उगाचच अस्वस्थ झालेल्. हे असे का होते, याला कारण आहे. अनेक स्त्रियांना अशा प्रकारच्या अनुभवातून अगदी पाळीची सुरुवात होण्यापासून ते मासिकपाळी थांबेपर्यंत जावे लागते. याला प्रिमेन्सस्ट्रयल सिन्ड्रोम किंवा ‘पीएमएस’ असे म्हणतात. म्हणजेच मासिक पाळीपूर्वी निर्माण होणारी समस्या किंवा आजार होय.

या दरम्यान अनेकदा अनेक महिलांना थकल्यासारखे,उदास-उदास वाटते. पण काही विशिष्ट लक्षणे सातत्याने पाळीपूर्वी दिसू लागली तर हा पाळीपूर्वी येणारा आजार असे ओळखले पाहिजे. पीएमएस हा मासिक पाळीपूर्वीच येतो आणि त्यात विविध प्रकारची शारीरिक व मानसिक लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ही लक्षणे अगदी साधारण असतात. पण ती प्रत्येक मासिक पाळीपूर्वी येणारी ही लक्षणे जर तीव्र असतील तर त्याचा त्या स्त्रीला आणि इतर लोकांना देखील त्याचा त्रास होतो, त्यामुळे पीएमसचे निदान करून घेणे आवश्यक असते.

पीएमएस ही समस्या का निर्माण होते ?

 मासिकपाळी येण्याच्या कमीतकमी दोन आठवडे अगोदर स्त्रियांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. मासिक पाळी सुरू झाली की ही लक्षणे मासिकपाळी संपेपर्यंत कमी होऊ लागतात. पीएमएस नक्की कशामुळे होतो याचे ठोस असे काही कारण नाही . पण स्त्रीची येणारी पाळी ही दर इस्ट्रोजेन व प्रोजेसस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बदलत राहते आणि त्यानुसार पीएमएस होतो. स्त्रीच्या स्वभावात किंवा भावनेत होणारा बदल हा तिच्या हार्मोन्समुळेच होत असतो. बऱ्याच वेळा हार्मोन्सबरोबर मेंदूतील सीरोटोनीन हे केमिकलसुद्धा पीएमएससाठी जबाबदार आहेत. त्यामुळे असा त्रास जाणवणाऱ्या महिलांनी डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घेणं आवश्यक असते

पीएमएसची लक्षणे

प्रत्येक स्त्रीमध्ये ती वेगवेगळ्या प्रकाराने दिसू शकतात. त्यांची तीव्रता आणि स्वरूप हे प्रत्येक मासिक पाळीत बदलूही शकते.

१. शाररिक लक्षणे

शरीर जड वाटणे,डोके जड झाल्यासारखे वाटणे किंवा डोके दुखत राहणे, पाठीत दुखणे, ओटीपोटीतून वेदना येणे.पायांच्या स्नायूत गोळे येतात. अत्यंत थकल्यासारखे वाटते. उलटीसारखे वाटणे . अ‍ॅसिडिटी झाल्यासारखे वाटते. स्तनांमध्ये दुखरेपणा जाणवतो. भूक लागत नाही किंवा खूप खावेसे वाटते. संपूर्ण शरीरात वेदना जाणवणे.

२. मानसिक लक्षणे

सतत चीड-चीड होणे मूड स्विंग होणे राहणे. कश्यातच लक्ष न लागणे. खूप राग येतो. हताश वाटणे,छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये रडू येणे,वाईट वाटणे. ही लक्षणे हे चिंताजनक आहे म्हणून पीएमएस ओळखणे खूप आवश्यक आहे. ८० टक्के महिलांमध्ये मासिक पाळी येण्याअगोदर काही सामान्य लक्षणे जाणवतात. तर साधारणत: ५ ते ८ टक्के स्त्रियांमध्ये पीएमएस खूप गंभीर स्वरूपातही दिसू शकतो. त्या स्त्रियांनी त्याचे निदान डॉक्टरकडून करून घेणे आवश्यक आहे. पीएमएसचे व्यवस्थित निदान करणे आवश्यक आहे.

 काय काळजी घ्यावी ?
१. जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

 यासाठी स्वतःची एक निश्चित दिनचर्या ठरवणे गरजेचे आहे, वेळच्या वेळी जेवणे, जागरण न करणे, चहा-कॉफीचे प्रमाण कमी करणे. या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे  पाळणे शक्य होणे अवघड आहे. पण प्रयत्न करण्यास काय हरकत आहे. किंवा अगदीच शक्य नसल्यास साधरणतः मासिकपाळीच्या आधी तरी काही दिवस या गोष्टी पाळणे सुरु करावे. आणि एकदा ये गोष्टीची सवय झाल्यावर त्या पाळणे कठीण जात नाही त्यामुळे. जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.  

२. आहार 

संतुलित आहार घेणे. उदा- मीठचे प्रमाण कमी करणे, तेलकट कमी खाणे, उत्तेजक द्रव्यांचे जसे कॉफी ,चहा याचे सेवन कमी करणे,फळे,भाज्या,कोशिंबिरीचा आहारात समावेश करणे. घरातले साधे जेवण जेवणे, शक्यतो बाहेरचे पदार्थ टाळणे. 

३. व्यायाम

रोज साधारणत: अर्धा तास शारीरिक व्यायाम करावा. ज्यामुळे चांगली संप्रेरके निर्माण होतील. तसेच योगाभ्यास आणि प्राणायाम हे या समस्येमध्ये उपयुक्त ठरू शकतात. मेडिटेशन किंवा ध्यानधारणा यामुळे मानसिक समतोल साधण्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकते. (मासिकपाळी दरम्यान व्यायाम करू नये अथवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा )

४. कुटूंबाकडून मानसिक आधार

या दरम्यान स्त्रीला मानसिक आधाराची आणि तिच्या वेदना आणि त्रास समजून घेण्याची आवश्यकता असते. आणि हा आधार कुटूंबाने देणे आवश्यक असते. ज्यामुळे या समस्येला तोंड देणे त्या स्त्रीला सोप्पे जाईल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon