Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

स्त्रियांना अशक्तपणा आल्यावर काय होते ?

थोडेसे काम केले की, लगेच काही स्त्रियांना थकवा येतो. आणि असा थकवा व अशक्तपणा खूपच स्त्रियांना येत असतो. आणि जरी तुम्ही गरोदर नसाल किंवा सामान्य स्त्री असाल तरीही अशक्तपणा का येतोय ? आणि त्याला कसा दूर करता येईल. ह्याही गोष्टी बघायला हवा. कारण हा थकवा आणि अशक्तपणा तुम्हाला कमजोर बनवून कोणत्याच कामाला मन लागू देत नसतो. तेव्हा ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ.

१) अशक्तपणा येण्याची लक्षणे

रक्तात सामान्य रक्तपेशींपेक्षा कमी पेशी असणे

लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण 10 ग्रॅम / डील यापेक्षा कमी असल्यास

२) हिमोग्लोबिन चे प्रमाण ह्याप्रमाणे असेल (त्यानुसार अशक्तपणा येतो)

प्रौढ पुरुष – 13 ग्रॅम / डीलपेक्षा कमी असेल तर 

गर्भवती नसलेली प्रौढ स्त्री – 12 ग्रॅम / डीलपेक्षा कमी असेल तर 

गर्भवती स्त्री – 11 ग्रॅम्सपेक्षा कमी असेल तर 

6 महिने ते 6 वर्षांची मुलं – 11 ग्रॅम / डील असेल तर 

6 वर्षे ते 14 वर्षांची मुलं – 12 ग्रॅम / डील असेल तर 

जर तुम्हाला  अशक्तपणा वाटत असेल तर एकदा तुमचे हिमोग्लोबिन तपासून घ्या. म्हणजे ह्यावर उपाय तुम्ही करता येईल. आणि त्यासोबत खूप काळजी आणि चिंता करत बसू नका. ह्यामुळे अशक्तपणा तर येतोच पण त्याच्या गरोदर न होण्यात सिहांचा वाटा होऊन जातो. म्हणजे गरोदर होत नसाल तर त्याला खूप मानसिक ताण कारणीभूत असतो. 

३) ही कारणे आहेत अशक्तपणा येण्याची 

* फॉलीक असिडची कमतरता

* जीवनसत्व ब 12 ची कमतरता

* लोह कमतरता

* रक्तपेशींचे नुकसान करणारा ठराविक रोग

* वारंवार संक्रमण होणे (जसे हिवताप)

* काही प्रकारचे अस्थिमज्जा रोग

* अपुरा आहार त्यामुळे कुपोषण

* गर्भधारणेदरम्यान अपुरा आहार

* मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे

४) अशक्तपणा आल्यावर तुमच्यासोबत काय होते

* थकवा

* छातीत दुखणे

* श्वास लागणे

* शरीर सुजणे

* त्वचा फिकी पडणे

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon