Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

स्त्रीला जेव्हा गर्भपाताला सामोरे जावे लागते

 

असे म्हटले जाते की, प्रत्येक स्त्रीचा गर्भपात एकदा तरी होत असतो. आता तर काही स्त्रिया सध्या मूल नको म्हणून गर्भपात करून घेतात. काही स्त्रियांना मूल पाहिजे असते तरी काही कारणास्तव गर्भपात होतो. गर्भारपणाच्या सातव्या महिन्याच्या २८ आठवडेच्या आत गर्भ पडून जाणे म्हणजे गर्भभात होय. आणि जर सातव्या महिन्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत ( ३७ आठवड्यात प्रसूती झाल्यास अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण होते.

गर्भपात होण्याची कारणे

 

१. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात काही दोषांमुळे जसे की, काही कारणामुळे गर्भात काहीतरी विकृती असेल.

२. काही व्यंग असेल तरी गर्भपात होतो.

३. कधी गर्भपेशींच्या गुणसूत्रांमध्ये दोष असतो. गुणसूत्रांची संख्या नेहमीपेक्षा कमी-जास्त होऊन जाते. कधी त्यांच्या रचनेत बदल झालेला असतो.

गर्भपात केव्हा होऊ शकतो

१. पहिल्या तीन महिन्यात गर्भपात होतो, तो बऱ्याचदा गर्भात दोष असतो म्हणून होतो. असे असले तरी कधी - कधी गरोदर स्त्रीमध्ये दोष असतो म्हणूनही होऊ शकतो.

२. गर्भारोपण आणि गर्भपोषण यासाठी प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावाची आवश्यकता असते. त्यांच्या कमतरतेमुळे गर्भपात होऊ शकतो.

३. काही वेळा गर्भाशय आकाराने लहान असते.

४. कधी गर्भाशयात गाठ झालेली असते. तर काही वेळा गर्भाशयाची रचना व ठेवणं योग्य नसते.

५. शारीरिक किंवा मानसिक आघात झाल्यासही गर्भपात होऊ शकतो. मग त्यात उंचीवरून खाली पडणे, रस्तावरील अपघात, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने मानसिक आघात, झाल्यावरही गर्भपात होऊ शकतो.

प्रसूतीच्या तीन महिन्यात यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.   

४ ते ७ महिन्याच्या दरम्यान गर्भपात झाला असेल तर, स्त्रीमध्ये Toxoplasma, Mycoplasma, Syphilis,  या प्रकारचा जंतुसंसर्ग झालेला असेल किंवा मलेरियामुळे खूप ताप आला असेल तर गाठ होऊ शकेल. थायरोईड ग्रंथीचे आजार असतील तरी गर्भपात होऊ शकतो. बऱ्याच वेळा सैल मुख वाढणाऱ्या गर्भाचे वजन पेलू शकत नाही म्हणून गर्भ पडून जायची शक्यता असते.

गर्भपाताची लक्षणे

ओटीपोटात दुखायला लागते. पाठीच्या खालच्या बाजूला पाळीच्या वेळी येतात तशा कळा यायला लागतात. अंगावरून रक्त जायला लागते. आधी त्याचे प्रमाण खूप कमी असते पण नंतर ते प्रमाण वाढायला लागते. काही वेळा जाडसर तुकडे किंवा संपूर्ण गाठच पडून जाते. तेव्हा शारीरिक तपासणी करताना योनीमार्गला चेक करून गर्भाशयाचा आकार पाहिला जातो. अल्ट्रासोनोग्राफी, Serum Beta HCG इ. चाचण्या केल्या जातात. यांच्या तपासणीतून जे निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात.

या लेखात तुम्हाला गर्भपात का होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत. ते सांगितली याच्यापुढच्या लेखात त्याच्यावर उपाय सांगितला जाईल.
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon