Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

स्त्रीची प्रजनन यंत्रणा आणि योनी रचना


मुलाला जन्म देण्यासाठी स्त्रीच्या शरीरात प्रजनन यंत्रणेची संरचना केली आहे. तसेच त्याच बरोबर स्त्रीला लैंगिक सुखाचा आनंद घेता यावा यासाठी देखील काही अवयवाची संरचना करण्यात आली आहे. याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ. 

१. गर्भाशय

 गर्भाशय मुलीच्या ओटीपोटामध्ये मूत्राशयांच्या मागे असते. त्याला दोन बीजकोष आणि बीजवाहिन्या जोडलेल्या असतात. हा अतिशय चिवट अशा स्नायूंनी बनलेला एक अवयव आहे. गर्भाशयाच्या तोंडाला ग्रीवा म्हणतात. ग्रीवेच्या खाली योनिमार्ग असतो. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनांनंतर फलित झालेले बीज  गर्भाशयाच्या अस्तरामध्ये रुजतं आणि काही काळ त्या अस्तरातील रक्तावरच त्याचं पोषण होतं. फलित बीज किंवा गर्भ राहिला नाही तर गर्भाशयाचं अस्तर गळून पडतं. त्यालाच मासिकपाळी म्हणतात. गर्भाशय एवढे चिवट असते जसं -जसा गर्भ वाढत असतो तितके ते ताणले जाण्याची त्यात क्षमता असते. तसेच ज्यावेळी बाळाचा जन्म होतो, त्यानंतर आपल्या पूर्वीस्थितीत येण्या इतके आकुंचन पावते.

२. बीजकोष 

स्त्रीच्या शरीरात दोन बीजकोष असतात. वयात आल्यानंतर त्यातील संप्रेरकं कार्यरत होतात. दर पाळी चक्रामध्ये बीजकोषांमध्ये असलेली बीजं परिपक्व व्हायला सुरुवात होते आणि कोणत्याही एका बीजकोषातून एक परिपक्व बीज बाहेर येऊन बीजनलिकांमध्ये पोचतं. याला अंडोत्सर्जन (ovulation) म्हणतात.

३. योनी 

स्त्रीच्या जननेंद्रियांमध्ये योनिचा समावेश होतो. योनिमार्गाचं दार, मूत्रद्वार किंवा लघवीची जागा, क्लिटोरिस अशा सर्व अवयवांची मिळून योनी बनते. योनिच्या दोन्ही बाजूस त्वचा असते. त्याला बाह्य ओठ आणि आतले ओठ असं म्हणतात. 

४. योनिमार्ग 

योनिद्वारापासून सुरू होतो आणि ग्रीवेपाशी गर्भाशयाला जोडलेला असतो. संभोगाच्या वेळी या योनिमार्गातूनच पुरुषाचे लिंग याच मार्गाने आत जाते. मासिकपाळीत होणारा रक्तस्त्राव हा योनिमार्गातूनच बाहेर येत असतो, याच मार्गाने बाळाचा जन्मदेखील होतो. योनीमार्ग एवढा लवचिक असतो नैसर्गिक प्रसूतीमध्ये अख्खे बाळ या मार्गातून बाहेर येऊ शकते इतकी लवचिकता आणि क्षमता या योनीमार्गात असते. 

५. क्लिटोरिस

योनीच्या वरच्या बाजूला क्लिटोरिस नावाचा छोटा पण अतिशय संवेदनशील असा अवयव असतो. हा पूर्णपणे लैंगिक अवयव आहे. आणि स्पर्शाला अतिशय संवेदनशील असतो. समागमामध्ये क्लिटोरिसला स्पर्श झाल्यास स्त्रीला लैंगिकसुख मिळते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon