Link copied!
Sign in / Sign up
49
Shares

स्त्री गर्भवती असेल तर ह्या गोष्टी बिलकुल करू नये

गर्भवती स्त्रीसाठी दररोजच्या अशा काही गोष्टी असतात की, त्या करायला नको. नाहीतर तिच्या बाळासाठी समस्या तयार होऊ शकते. तिला सर्वच बाबी माहिती नसतात एक तर ती तिच्या आईकडून किंवा सासूकडून ह्याबाबत मार्गदर्शन घेत असते. पण त्यांनाही सर्वच बारीक सारीक गोष्टी माहिती नसतात तेव्हा त्यासाठी काही माहिती ह्या ब्लॉगमधून.

* दररोज ह्या गोष्टी होणार नाही ह्याकडे गर्भवतीने लक्ष द्यावे. 

* मल-मूत्रप्रवृत्ती किंवा होणाऱ्या गॅसचा वेग अडवणे. 

* बसताना खूप हळुवार बसणे आणि कडक जागी बसू नये. 

* बसताना पाठीचा कणा ताठ ठेवावा कारण वजन पुढच्या बाजूला जात असते. 

* नेहमी नेहमी पाठीवर निजू नये तर कुशीवर निजावे आणि वाटल्यास उशी मदतीला घ्यावी. 

* खूप घट्ट आणि तंग कपडे घालू नये. 

* मजल्यावरून खिडकीतून, टेरेसवरून, खड्यात,  फार उंचावरून खाली बघण्याचा प्रयत्न करू नये. 

* अप्रिय, कर्कश आवाज वा संगीत न ऐकणे,

* प्रमाणापेक्षा अधिक शारीरिक कष्ट, व्यायाम न करणे, शरीराला खूप कष्ट देणे. 

* सतत प्रवास न करणे. विशेषतः पहिल्या तीन व शेवटच्या दोन महिन्यांमध्ये शक्‍यतो लांबचा प्रवास टाळणे,

* आरामदायी, सुटसुटीत कपडे घालणे,

* उंच टाचेच्या चपला न वापरणे,

* मद्यपान-धूम्रपान टाळणे, जंक फूड खाणे, सोडा 

* जागरणे न करणे, तसेच दुपारी न झोपणे. 

* मानसिक स्तरावर आनंदी, प्रेमळ राहण्याचा प्रयत्न करणे, भीतिदायक वाचन किंवा मालिका, खूप दुःखदायक किंवा भीतीदायक चित्रपट पाहणे टाळणे. 

* शक्‍यतो मैथुन टाळणे, विशेषतः पहिल्या तीन व शेवटच्या तीन महिन्यांत समागम टाळणे,

* अस्वच्छ, अप्रिय ठिकाणी फार वेळ न राहणे

* अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी गर्भावर चांगले संस्कार होण्यासाठी, तसेच गर्भवती व गर्भ या दोघांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. तुमचे बाळ तुमच्यासाठी खुप महत्वाचे  आहे तेव्हा ह्या गोष्टी त्याच्या आरोग्यासाठी करा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon