Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

स्ट्रॉबेरी ह्या कारणांसाठी खायला हवी

लाल रसरशीत बोरासारखी स्ट्रॉबेरी पाहिल्यावर ओठ लाल होऊन जातात. आणि स्ट्रॉबेरी आपल्याकडे सहज मिळून जाते. आणि हा हंगाम स्ट्रॉबेरीचा आहे. स्त्रियांना स्ट्रॉबेरी खूप आवडत असते. तेव्हा स्ट्रॉबेरी चे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊया. स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे त्याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी त्या फायदेशीर आहेत. म्हणूनच थंडीच्या मोसमात बाजारात येणारी स्ट्रॉबेरी ही भरपूर खावी.

स्ट्रॉबेरी खाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार आहेत.

१) स्ट्रॉबेरी सेवणामुळे हृद्यविकार आणि मधुमेहावर मात करता येते. दिवसभर खूप थकून जातात तेव्हा स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्याप्रमाणात असल्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळतो. आणि शरीराची झीज भरून निघते. 

२) स्ट्रॉबेरी ऑक्साइड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठी देखील लाभकारक आहे. स्ट्रॉबेरीमुळे मोतिबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरीतील ‘क’ जीवनसत्वामुळे डोळ्यांना प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो. स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अधिक चमकदार होतात. 

३) यामधील  ‘क’ जीवनसत्व त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते. त्यामुळे त्वचा तजेलदार होते. पोटॅशिअम हे द्रव्य स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक असल्याने हृद्यविकाराचा झटका टाळण्यास मदत करते.

४) तांबड्या रक्तपेशींच्या अभावाने महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. स्ट्रॉबेरीमधील फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरी खाल्ल्यानं त्वचा तजेलदार होते, तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात.

५) सायट्रीक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीमध्ये असल्याने दात चमकदार होतात आणि हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.  स्ट्रॉबेरीमधील ‘फोलेट’ हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.

६) स्ट्रॉबेरीमधील पोटॅशिअम उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते. मँगेनिज हे खनिजद्रव्य देखील स्ट्रॉबेरीत असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि हाडेदुखीपासून दिलासा मिळतो.

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon