Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

स्तनपानविषयी काही शंका आणि त्यांची उत्तरे

जन्म झालेले बाळ अनेक रोग आणि आजारांना लगेच बळी पडू शकते कारण यावेळी त्याची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी असते आणि त्याचे शरीर अतिशय नाजूक असते. शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवणे आणि बाहेरच्या जीवाणूंपासून शरीराचे रक्षण करून जगण्याची शक्ती वाढवणे हे बाळासाठी आव्हान असते. यात आईचे दुध अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.

तुमच्या बाळाचे पहिले अन्न म्हणजे तुमचे दुध असते. हे बाळाचे सगळ्यात नैसर्गिक अन्न असते आणि ह्यात सगळी महत्त्वाची पोषकद्रव्ये आणि बाळाच्या वाढीसाठी लागणारी उर्जा असते. सुरवातीला तुमचे दुध घट्ट, दह्यासारखे असेल ज्यांमध्ये कोलोस्ट्रम म्हणजे तुमच्या स्तनातील ग्रंथीमधून तयार होणारा पदार्थ असतो. यात बाळाला आवश्यक असणारी सर्व प्रकारची प्रतिपिंडे म्हणजेच Antibodies उपस्थित असतात. ही प्रतिपिंडे बाळाच्या केवळ वाढीसाठीच उपयोगी ठरत नाहीत तर बाळाला सतत आजार पडण्यापासून देखील वाचवतात.

बाळाला सुरवातीच्या ६ महिन्यात योग्य प्रमाणात आईचे दुध मिळणे आवश्यक असते. नवीन मातांना स्तनपानात अनेक शंका आणि प्रश्न उभे राहतात त्यांचेच निरसन करण्यासाठी आम्ही सगळ्यात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत.

१. आईचे दुध साठवून ठेवता येते का?

तुमचे दुध हे पोषकद्रव्यांनी पुरेपूर आहे, यात जीवनावश्यक घटक आहेत आणि दुधाच्या इतर कोणत्याही स्त्रोतापेक्षा तुमचे दुध हे बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे. ताजे आणि नेहमी उपलब्ध असणारे तुमचे दुध तुम्ही नक्कीच साठवून ठेवू शकता. यासाठी ते फ्रीज मध्ये साठवावे लागेल. तुम्ही ब्रेस्ट पंपने हे दुध काढून फ्रीज मध्ये साठवू शकता. यातील जीवाणू नष्ट होणार नाहीत त्यामुळे काळजी करू नका. परंतु फ्रीज मधून काढल्यानंतर थोडेसे गरम करून मग बाळाला पाजा. तुम्हाला यातील दुधाचे कण वेगळे होतांना दिसतील पण त्याला तापवल्यानंतर बाळाला दिल्यास चालते.

२. दुधाच्या घट्टपणाबाबत काळजी करण्याची गरज आहे का?

जर तुमच्या लक्षात आले की बाळ पिणारे दुध हे घट्ट, मलई सारखे आहे तर ते तुमचे स्तनांमधून येणारे शेवटचे दुध आहे आणि जर बाळ पीत असलेले दुध पातळ असेल तर ते तुमच्या स्तनांमधून येणारे सुरवातीचे दुध आहे. असे परिपूर्ण दुध काहीच नसते. जर तुम्हाला बाळाच्या तोंडाभोवती किंवा दुधाच्या बाटलीत जाडसर दुधाचे सायीसारखे कण दिसले तर ते तुमच्या दुधातीलच स्निग्ध आणि मेद घटक आहेत.त्यामुळे दुधाच्या घट्टपणाविषयी काळजी करू नका.

३. दुग्धपान वाढवण्यासाठी मातेने कोणते पदार्थ खावेत ?

तुमचे दुध हेच बाळासाठी पोषक स्त्रोत असते त्यामुळे आईनेपण या दुधाची पोषकता वाढवण्यासाठी तिच्या शरीरात जीवनसत्वे आणि पोषकद्रव्यांचे सेवन वाढवले पाहिजे.

४. स्तनांच्या आकारावरून दुधाचे प्रमाण ठरते का?

स्तनांचा आकार मोठा असणे याचा अर्थ तुमच्या शरीरात जास्तीचे दुध निर्माण होत असेल असे नाही. रेफ्रिजरेटर प्रमाणे मातेला हे दुध शरीरात साठवता येत नाही. स्तनांच्या आकाराचा दुधाच्या निर्मितीशी काहीही संबंध नसतो. बाळाच्या गरजेपुरते दुध प्रत्येक मातेच्या शरीरात तयार होत असते.

५. मला स्तनपान देतांना स्तनांमध्ये वेदना होतात. याचा स्तनांच्या कर्करोगाशी काही संबंध आहे का?

तुमचे स्तन आता प्रौढ झालेले असतात आणि समोरच्या बाजूस थोडेसे चिरलेले असतात जेणेकरून बाळाला सहज दुध पिता येईल. अशावेळी तुमचे स्तन सुजतात कारण त्यांना चोखले जाण्याची सवय नसते. त्यामुळे सुरवातीला दुध पाजतांना दुखणे साहजिक आहे. काही काळानंतर ह्याची सवय होते आणि सोबतच हे दुखणे देखील थांबते.

६. स्तनपान देतांना कमी पाणी प्यायल्याने दुधाची निर्मिती कमी होते का?

जर तुम्ही स्तनपानाच्या काळात स्वत:ला हायड्रेटेड नाही ठेवले तर असे होऊ शकते. घट्ट आणि पोषक असलेल्या दुधाचे घन तयार होतात आणि त्यामुळे दुध बाहेर येण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर स्तनपान देत असाल तर भरपूर पाणी प्या आणि स्वत:ला दिवसभर हायड्रेटेड ठेवा.

काळजी घ्या.    

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon