Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

स्तनपान देताना वेदना का होतात ?


       बाळाला अंगावर पाजण्याच्या निमित्तानं मायेचा स्पर्श बाळाला मिळत असतो. त्यातून त्याचं आईशी खूप जवळचं नातं निर्माण होत असतं. पण जसं प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी थोडासा त्रास सहन करावा लागतो, तसंच स्तनपानाचंही असतं. आपलं बाळ तंदुरूस्त असणं हा प्रत्येक आईसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण त्यासाछी आवश्यक असलेलं स्तनपान हे म्हणावं तेवढी सोपी गोष्ट नसते. स्तनपान करताना आईला अनेकवेळा त्रास होतो. पण कधी कधी तो त्रास खूपच वेदनादायी असतो. स्तनपान करताना आईला वेदना होण्यामागे पुढील कारणे असू शकतात.

 

१) अयोग्य पकड

बाळाला स्तनपान करताना बाळाच्या तोंडाची स्तनांना योग्यप्रकारे पकड झालेली असणे आवश्यक आहे. अन्यथा त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही बाळाला स्तनपान करताना योग्यप्रकारे पकडणे खूप आवश्यक आहे.

2) स्तन जड होणे

यालाच Breast Engorgement असंही म्हणतात. प्रसूतीनंतर काही नवमातांना या समस्येला तोंड द्यावे लागते. जर स्तनांमध्ये तयार होणाऱ्या दुधापेक्षा बाळ खूप कमी दूध पित असेल, तर ही समस्या उद्भवते. या समस्येमुळे त्या आईचे स्तन दूधाच्या अति निर्मितीमुळे भरतात. त्यामुळे ते सूजतात, टणक बनतात व वेदना होतात. अशावेळी स्तनाग्रे सपाट होतात. त्यामुळे दूध पिताना बाळाला स्तनांवर योग्यप्रकारे ग्रिप धरता येत नाही.

3) स्तनाग्रांमधील बबल्स

जर स्तनामधील दूधाचा निचरा प्रभावीपणे झाला नाही तर ही समस्या निर्माण होते. कधीकधी चिकट दूधामुळे देखील दूधाचा पुरवठा करणाऱ्या या नलिका आतून ब्लॉक होते. बाळ त्यावेळी स्तनाग्रातून जास्त जोरात दूध शोषण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्तनांना जास्त त्रास होतो.

४) बाळाच्या जीभेची हालचाल न होणे

जर बाळ त्याच्या जीभची योग्य प्रकारे हालचाल करू शकत नसेल, तर बाळाला दूध शोषणे खूप अवघड बनते. त्यामुळे बाळ त्याच्या जीभेने स्तनाग्रांना वरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्तनाग्रांना त्रास होतो.

५) छाले

जर बाळाच्या तोंडात छाले आले असतील, तर स्तनपानामुळे त्याचा परिणाम आईवरही होऊ शकतो. आईच्या निप्पललाही त्याचा त्रास होऊन दाह निर्माण होऊ शकतो. त्यावर वेळीच उपचार केला नाही, तर तुमच्याकडून बाळाला आणि बाळाकडून तुम्हाला हा त्रास कायम राहू शकतो.

६) दात येणे

सहा महिन्यानंतर बाळाला दात येण्यास सुरूवात होते. त्यामुळे याकाळात स्तनपान खूपच त्रासदायक बनते. अशावेळी तुमच्या बाळाला चघळण्यासाठी टीथर किंवा धुतलेले मऊ कापड द्या.

७) पिंपल्ससारखा तुमच्या स्तनाग्रावर एक पांढरा ठिपका दिसतो. तो दुधाने भरलेला असतो आणि स्तनाग्रांच्या छिद्रांमध्ये दिसून येतो. अशावेळी बाळ जेव्हा दूध ओढते तेव्हा खूप वेदना होतात. अशावेळी ओला कपडा वापरून हळूवारपणे दाबून ते काढून टाका.

८) स्तनाग्र ब्लॉक होणे

स्तनाग्र ब्लॉक झाल्यामुळे दूधाचा निचरा होणे थांबते. त्यामुळे स्तनाग्रांना खूप वेदना होतात. अशावेळी तुमच्या स्तनांना मसाज करा आणि गरम टॉवेल वापरा. त्या उष्णतेने ब्लॉक क्लिअर होऊ शकतो.

९) स्तनदाह

सामान्यपणे प्रथमच आई झालेल्या सर्वांना हा त्रास होतो. स्तनाग्रांच्या जवळचा भाग सुजतो. स्तनपान करताना बाळाची स्तनांवर योग्यप्रकारे पकडे बसली नाही किवा एकाच एकाच स्तनाने स्तनपान केल्यास ही समस्या उद्भवते.

१०) उलटे स्तनाग्र

प्रथमच आई झालेल्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. त्यांची स्तनाग्रे लगेच फुलत नाहीत. त्यामुळे बाळ दुध शोषू शकत नाही. त्यामुळे आईलाही प्रचंड वेदना होतात. अशावेळी स्तनांना उत्तेजना देण्यासाठी तुम्ही ब्रेस्ट पंपचा वापर करू शकता.   

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon