Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

स्तनपान करण्यावेळी बाळ दूध पिताना का झोपून जाते आणि तेव्हा बाळाला कसे दूध पाजाल !!!

तुमचे बाळ हे स्तनपान करताना दूध पीत असतानाच झोपून जात असेल तर. आणि असे खूप वेळा होत आहे की, बाळाला दूध पाजायला सुरुवात केलीच की, त्यानंतर लगेच बाळ झोपून जाते. आणि ह्या समस्येमुळे बाळाचे पोटही व्यवस्थित भरत नाही. बाळाची भूक बाकीचं असते. आणि ह्यामुळे बाळाला पोषक तत्त्वही मिल नाही आणि बाळाची प्रकृतीसुद्धा उत्तम राहत नाही. आणि तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का ? तुमचे बाळ दूध पीत असतानाच का झोपून जाते.

 

१) काही बाळांची सवय असते पण

खूप तान्ही बाळ जन्म घेतल्यावर काही आठवडे आणि काही महिने स्तनपानाच्या वेळेस झोपून जात असतात. आणि एक आई होण्याच्या नात्याने तुम्हाला ही गोष्ट खूप चिंतेची आणि बाळाचे वजन वाढेल की, नाही ह्याबाबत तर अधिकच काळजी वाटते. आणि ह्यावेळी तुम्हाला स्वतःविषयी गिल्टी वाटते की, बाळाला दूध पाजू शकता नाही. पण सुरुवातील ह्या गोष्टी नॉर्मल असतात. पण त्याला त्याही वेळेस दूध पाजण्याचा प्रयत्न करावा.

२) बाळांची झोप किती असते ?

काही तान्हे बाळ कमी झोप घेत असतात आणि काही बाळांना खूप झोप लागते. आणि ते नैसर्गिक असते. त्याचवेळी काही बाळांना पोट भरल्यावर म्हणजे स्तनपान केल्यावर झोप लागत असते. तशी बाळांची झोप ही, १४ ते १८ तासांची असते. पण प्रत्येक बाळाची झोपण्याची सवय वेगवेगळी असू शकते. आणि जन्मानंतर बाळाची काही महिनेपर्यंत झोप घेण्याचा आणि स्तनपान करण्याचा निश्चित पॅटर्न नसतो. त्यामुळे तुमच्या बाळासोबत असे होत असेल तर खुप चिंता करू नका.

३) सामान्यतः बाळाला किती वेळ स्तनपान करायला हवं

हे बाळाच्या पोट भरण्यावर अवलंबून असते. आणि सामान्यतः बाळाला ८ ते १२ वेळा स्तनपान करण्याची गरज असते. पण काही बाळ ह्यापेक्षा जास्त स्तनपान करत असतात. आणि जर तुमच्या स्तनातून जर पुरेसे दूध मिळत नसेल. त्यामुळे बाळाला मधून मधून दूध द्यावे. जर तुम्ही काही वेळानंतर स्तनपान करणार तर तुमच्या स्तनात दूध यायला लागते.

४) बाळाला दूध प्यायचे आहे त्याची लक्षणे

*     तुमचे बाळ झोपण्यावेळी काहीतरी हालचाल करणार आणि डोळे फडफड करणार

*   बाळ आपली मान इकडे - तिकडे हलवणार.

५) बाळाला स्तनपानासाठी जागवून ठेवण्यासाठी काय करता येईल

*  ज्यावेळी तुमचे बाळ झोपायला लागले त्यावेळी तुम्ही खोल श्वास घ्या आणि बाळाकडे प्रेमाने बघत रहा.

*    आता तुम्ही आरामदायक स्थितीत निजून बाळाला आपल्यावरती कडेवर घ्यावे. त्यावेळी त्याची त्वचा व तुमच्या त्वचेचा स्पर्श होऊ द्या आणि खूप हळू आवाजात त्याच्याशी बोला. ह्यामुळे तुमचे बाळ जागे राहते. ते झोपणार नाही. कारण आईचा स्पर्श आणि आईचे संभाषण.

*  रूममधली लाईट खूप प्रकाशित किंवा कमी नको. आणि त्याच्या पायाची हळूहळू मालिश करत रहा. व बोलत रहा.

*   तुमचे बाळ झोपून गेले तर त्याच्या ओठांना दूध लावून घ्या. त्याच्या स्वाद आल्याने बाळ उठून जाते.

*   ह्या सगळ्या गोष्टीसोबत तुम्ही निरीक्षण करत रहा बाळाला काय पाहिजे आहे आणि त्याचा पॅटर्न नेमका कसा आहे.        

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon