Link copied!
Sign in / Sign up
66
Shares

जाणून घ्या स्तनपान देणाऱ्या मातांनी काय खावे आणि काय पथ्ये पाळावी

आई होणे आणि बाळाला दूध पाजणे या गोष्टी खूप आनंददायी असतात. आपण फक्त मानव नाही तर सस्तन प्राणी आहोत त्यामुळे बाळाला दूध पाजून मोठे करण्यायोग्य शरीराची निर्मिती केली जाते. निसर्गाने ही एक अदभूत अशी संरचना केली आहे असे म्हणू शकतो. स्तनपानाचे महत्त्व अगदी सुरुवातीपासूनच सांगितले जाते आणि ते बाळाचे नैसर्गिक रक्षण करतेच शिवाय प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत करते. सुरुवातीचे सहा महिने तर स्तनपान हेच बाळाचे अन्नपाणी असते. त्यामुळे ते सकस असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

स्तनपान करणाऱ्या मातांनी काही गोष्टी खाऊ नयेत किंवा त्या टाळाव्यात असे आया, आज्या सांगतात कारण ते परंपरेने चालत आलेले आहे. त्यांचे कदाचित ते अनुभवाचे बोल असतील. मात्र अधुनिक काळात मात्र मातेने सर्व खावे असे सांगितले आहे. थोडक्यात मातेने सकस आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे असेच सर्वांचे सांगणे आहे.

मातेच्या दुधातूनच बाळाचे पोषण होणार असते म्हणून चौरस आहार घेतला पाहिजे.

मातेचा आहार -

स्टार्चयुक्त आहार

भात, पूर्ण धान्याची पोळी, रव्याची खीर, तसेच डाळ आहारात असावी.

लोहयुक्त आहार-

स्तनपानाच्या काळात लोहाची गरज भागली पाहिजे. त्यासाठी डाळी, मोडाची धान्ये, मिठाई आणि हिरव्या पालेभाज्या. काही प्रमाणात मासळी, अंडी

कॅल्शिअम-

आहारात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असावे त्यासाठी दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, फळे

डी जीवनसत्त्व-

हाडांचा विकास होण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो पण काही मासळींच्या सेवनानेही डी जीवनसत्व मिळू शकते.

सी जीवनसत्व-

लोहाइतकीच सी जीवनसत्वाची आवश्यकता आहे. अगदी थोड्या प्रमाणात  आंबट फळे, पपई, आवळा ह्याचे सेवन करावे.

ए जीवनसत्व-

गाजर, अंडे, हिरव्या पालेभाज्या, भोपळा, टोमॅटो आणि आंबा यांचे सेवन करावे.

सर्वसाधारपणे पारंपरिक आहारात तूप, सुकामेवा यांचे प्रमाण अधिक असते. मात्र डिंक - मेथीचे लाडू, हळीवाचे लाडू हे सर्व पारंपरिक पदार्थ सेवन करत असल्यास अतिरिक्त तेलातुपाच्या सेवनाची गरज नाही.

या सर्वांबरोबरच स्तन्याचे म्हणजेच दुधाचे प्रमाण वाढावे यासाठी भरपूर पाणी पिण्यास सांगितले जाते पण त्याची आवश्यकता नाही. तहान भागावी इतपत पाणी पिणे पुरेसे आहे. स्तनपान करणाऱ्या मातेला भूक जास्त लागते. त्यामुळे थोडा थोडा आहार थोडा थोडा वेळाने सेवन करावा. त्यामुळे विनाकारण चरबी न वाढता वजनही नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

बाळ पहिले सहा महिने फक्त आईच्या दुधावरच जगते. बाळाला या काळात पाणीही पाजले जात नाही. त्यामुळे मातेच्या आहारावर दुधाची निर्मिती अवलंबून असते.

त्यामुळे वरील आहाराचे सेवन करताना काही गोष्टी आहारातून टाळल्या पाहिजेत.

त्याचा थेट परिणाम दुधाद्वारे बाळावर होत असतो. त्यामुळे स्तनपान करताना काही गोष्टी खाऊ नयेत असे सांगितले जाते.

पथ्य काय पाळावे 

कोबी-

कोबी हा पोटात वायू निर्माण करणारा आणि बद्धकोष्ठता निर्माण करणारा असतो. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोबीचे सेवन करु नये. त्यामुळे मुलाच्या पोटात दुखणे, गॅसेस, बद्धकोष्ठता सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि बाळ अस्वस्थ होऊ शकते.

मटार-

स्तनपान करणाऱ्या महिलेने मटारचे सेवन करु नये. कारण मटार पचायला जड असतो त्यामुळे बाळाच्या पोटात वायू होणे, बद्धकोष्ठता असा त्रास होतो. कच्च्या मटाराचे सेवन तर टाळावेच. त्यामुळे मुलांचा पोटात वायू होण्याची भीती असते.

कॉफीचे सेवन-

कॉफीमध्ये कॅफिन अधिक प्रमाणात असते त्यामुळे बाळासाठी ती हानीकारकच असते. बाळाला पोटदुखी, वायू होणे यासारख्या समस्या भेडसावू शकतात. तसेच बाळाला अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. स्तनपान क़रणाऱ्या आईने शक्यतो कॉफीचे सेवन शक्यतो करु नये.

पुदीना-

स्तनपान करणाऱ्या महिलेने पुदीन्याची चटणी, पुदीन्याचा चहा इत्यादींचे सेवन करु नये. पुदीन्यामुळे स्तन्यवृद्धी अर्थात दूध वाढत नाही त्यामुळे बाळाचे पोट भरत नाही त्यामुळे बाळ रडते.

तळलेले, मसालेदार पदार्थ-

बाळ जेव्हा अंगावर पित असते म्हणजेच जेव्हा बाळाला केवळ स्तनपान सुरु असते तोपर्यंत आईने सकस, सुपाच्य आहार घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे बाळाला दुधातून योग्य पोषक घटक मिळतात जेणेकरून मुलांचा विकास उत्तम होतो. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ सेवन करु नयेत. त्याचा परिमाण आईच्या दुधावर होत असल्याने बाळांना पोटात वायू होणे, दुखणे किंवा अपचन सारखा त्रास होऊ शकतो. प्रसुतीनंतर जोपर्यंत बाळाचा आहार स्तनपान असेल तोपर्यंत आईने असे पदार्थ टाळणे उत्तम.

लसणाचे अतिसेवन-

लसूण आहारातून थोड्याश्या प्रमाणात सेवन करावा. कच्चा लसूण खाऊ नये. काही वेळा दुधाला उग्र वास आल्यास बाळ दूध पित नाही. त्यामुळे बाळाचा विकास वंचित राहातो.

चॉकलेट-

कॅफिन हा घटक असतोच कॉफीच्या तुलनेत कमी असला तरीही हा घटक असतो. त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो.

आंबट फळे-

आंबट फळांचे सेवन केल्यास बाळाला दूध पचवणे अवघड जाते. कधी बाळाला उलटी होऊ शकते. आईने सी जीवनसत्त्वाच्या पूर्ततेसाठी पपईचे सेवन करण्यास हरकत नाही.

ब्रोकोली-

ब्रोकोली ही देखील फ्लॉवर वर्गातील वनस्पती आहे त्यामुळे पोट दुखणे, घाबरल्यासारखे होणे असे त्रास बाळाला होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो याचे सेवन टाळावे.

शेंगा-

स्तनपान करणाऱ्या महिलांनी शेंगदाण्याचे सेवन करु नये त्यामुळे कदाचित बाळाला अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते.

अंमली पदार्थांचे सेवन-

स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही गोष्ट प्राधान्याने टाळलीच पाहिजे. धूम्रपान, मद्यपान इत्यादींचे सेवन बाळाच्या विकासाला मारक ठरते. शिवाय स्तनदा मातेच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अंमली पदार्थांचे सेवन करत असल्यास किमान गर्भारपणाचा आणि स्तनपानाचा काळ वगळाव

या पथ्यकर गोष्टी महिलांनी पाळाव्यात शिवाय त्यांनी जेवणाची वेळ जरुर सांभाळावी. बाळाला दर दोन तासांनी भूक लागते त्यामुळे आईचा आहार व्यवस्थित असेल तर बाळाला दूध व्यवस्थित पुरते. स्तनपान करणारी माता अशक्त आणि थकलेली असेल तर त्याचा परिणाम अर्थातच बाळाच्या विकासावर होणार त्यामुळे पौष्टीक आहाराचे सेवन अत्यंत गरजेचे आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon