Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

स्तनदा मातेचा आहार कसा असावा

 

प्रसुतीनंतर बाळासाठी आणि आईसाठीही महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे स्तनपान. स्तनपानाचे महत्त्व जागतिक स्तरावरही अधोरेखित केले गेले आहे. प्रसुतीनंतर लगेचच आईला येणारे पिवळसर दूध ज्याला चीक किंवा कोलेस्ट्रॉम म्हणतात ते बाळाला मिळणे अत्यंत आवश्यक असते. कारण त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्तनपान हे बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आईच्या दुधात प्रतिकार शक्ती वाढवण्याबरोबरच सर्वच पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच मुलांचा बौद्धिक विकास होण्यासही स्तनपान जरुरीचे असते.

स्तनपानासाठी तयारी

स्तनपानासाठी विशेष तयारी करावी लागत नाही मात्र स्तनपान देण्यासाठी आईने मनापासून तयार असायला हवे. काही अधुनिक माता स्तनपान देण्यास टाळाटाळ करतात कारण त्यामुळे शरीराची ठेवण बदलण्याची भीती त्यांना वाटते. मुळातच स्तनपान ही नैसर्गिक गोष्ट आहे. मातेने स्तनपान दिल्यानंतर बाळ आणि माता यांच्यामध्ये एक ओढ, जवळीक प्रेम निर्माण होते. बाळालाही मातेच्या कुशीत सुरक्षित वाटत असते. तसेच स्तनपानाचे आईलाही खूप फायदे होतात.

सर्वसाधारणपणे बाळाला दोन वर्षे स्तनपान द्यावे असे वैद्यकीयदृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे स्तनपान करणाèया मातेच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. स्तनदा मातेचा आहार वाढवण्याची आवश्यकता असते.

आहार का वाढवावा

१ बाळाचे योग्य पोषण

२ आईचे कुपोषण टाळण्यासाठी

३ मातेच्या शरीराची प्रसुतीकाळात झालेली झीज भरून काढणे

४ बाळाला चांगल्या गुणवत्तेचे, सकस, पोषक स्तनपान मिळण्यासाठी

बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला पाणीही पाजले जात नाही. ते फक्त आणि फक्त आईच्या दुधावरच अवलंबून असते. त्यामुळे आईचे दूध हे सकस आणि निरोगी असणे आवश्यक आहे. त्यासाठी मातेच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहते.

 प्रथिने आणि जीवनसत्वे 

बाळाला स्तन्य द्यायचे असल्याचे स्तनदा आईला अधिकच्या सुमारे ५०० किलो कॅलरी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथिने, जीवनसत्व, लोह आणि कॅल्शिअम यांचे प्रमाण अधिक असलेला आहार जरूर घ्यावा.

२. धान्य -कडधान्य 

 धान्य, कडधान्य, डाळी, सुकामेवा, ताजी फळे, भाज्या, अंडी आणि चिकन हे प्रथिनाचे उत्तम स्रोत आहेत. आईला आणि पर्यायाने बाळालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे या पदार्थांचा आहारात जरूर समावेश करावा.

३. पाण्याचे योग्य प्रमाण 

पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे जेणेकरून शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच मोसमी फळांचे रस अवश्य प्यावे. स्तनदा माते तहान लागली नसली तरीही थोडे थोडे पाणी सेवन करावे. त्यामुळे दुधाचा पुरवठा सातत्याने होत राहोत. ॉ

४. दुधाचे प्रमाण वाढावे या करता 

 सकाळ संध्याकाळी पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. विविध प्रकारच्या खीरी, शिरा, डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, खीर सेवन करावेत. हे पदार्थ स्तन्य म्हणजेच दूध वाढण्यास मदत करतात शिवाय दुधाची गुणवत्ता सुधारते त्यामुळे बाळाला योग्य पोषण मिळते.

५. लोहयुक्त आहार 

 आहारात लोहयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश असावा त्यामुळे प्रसुती काळात कमी झालेले रक्त भरून निघण्यास मदत होईल. लोह शरीरात शोषले जावे म्हणून सी जीवनसत्वाचे सेवन अवश्य करावे. त्यासाठी थोड्या प्रमाणात लिंबू, मनुके, संत्री आदींचे सेवन करावे.

 

६. ओटमील 

ओटमील चे सेवन स्तनदा मातेला फायदेशीर ठरु शकते. स्तनपान करणाऱ्या महिलांनी ओटसचा वापर आहारात जरुर करावा. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे ओटमिल मुळे स्तन्य म्हणजे दुधाचे प्रमाण वाढते.

७.लसणाचा समावेश 

लसूण पदार्थात घातल्याने चव अधिक चांगली होतेच पण लसूण दुधवाढीसाठी पोषक असतो. शिवाय औषधीही असतो. त्यामुळे गर्भवतीच्या आहारात त्याचा समावेश करावा.परंतु याचा समावेश डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव 

८.  गाजराचा समावेश 

 गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते त्यामुळे स्तनदा मातेसाठी ते उपयुक्त आहे. स्तनदा मातेने त्याचे सेवन जरुर करावे.

९. ड जीवनसत्व 

 डी जीवनसत्वाचे सेवन संपूर्ण आरोग्य आणि हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. कॅल्शिअम शरीरात शोषले जाण्यासाठी डी जीवनसत्वाची गरज असते. सकाळची कोवळी उन्हे त्वचेखाली डी जीवनसत्व तयार होते. पण ज्यांना उन्हात जाणे शक्य नाही त्यांनी डी जीवनसत्व असणारे पदार्थ जरुर सेवन केले पाहिजे. त्यासाठी रावस, बांगडा सारखे मासे सेवन करावेत. अंडी देखील डी जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहेत.

त्याशिवाय काही सवयी बदलाव्या लागतील कारण आईच्या आहाराच्या सवयींचा थेट परिणाम बाळावर होणार असतो त्यामुळे काही गोष्टी टाळव्यात.

पारंपरिक पद्धतीमध्ये बाळंतीणीला भरपूर तूप खाण्यास दिले जाते, सांगितले जाते मात्र स्तनदा माता योग्य पोषक आहार घेत असेल तर याची गरज नाही. त्याऐवजी पदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर करावा.

स्तनपान करणाèया मातेने चहा कॉफीसारख्या उत्तेजक पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करु नये. तसेच मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन करु नये.

स्तनदा मातेने उघड्यावरील अन्नाचे सेवन टाळावे. तसेच अतितेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

डॉक्टरी सल्ल्याशिवाय स्वमनाने कोणत्याही त्रासावर औषध घेऊ नये. तसेच प्रसुतीनंतर पुरेसा आराम करावा. पोषक सुपाच्य आहार सेवन करून बाळाला त्याच्या भुकेनुसार दिवसातून ८-१० वेळा स्तनपान जरुर करावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon