Link copied!
Sign in / Sign up
37
Shares

स्तनांबाबत काही समस्या ज्याची माहिती असणे आवश्यक आहे.

प्रसूतीनंतर आणि आधी आणि इतर वयातील देखील बऱ्याच स्त्रियांना अनेक स्तनांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अश्यावेळी बऱ्याच स्त्रियां घाबरून जातात आणि काय करावे त्यांना सुचत नाही. स्तनांबाबत निर्माण झालेली समस्या ही का कश्यामुळे निर्माण झाली आहे हे जाणून घेणं आवश्यक असते.

स्त्रियांमध्ये स्तनांमध्ये मुख्यतः चरबी व दूध निर्माण करणा-या ग्रंथी असतात. स्तनाच्या आतील भागात दूध स्तनाग्राकडे आणणारे दुग्धवाहिन्यांचे जाळे असते. प्रसूती नंतर स्तनपानाच्या काळात दूध निर्माण करण्याची क्रिया अखंडपणे वर्ष-दीड वर्ष चालू असते.

१. स्तनांमधल्या साध्या गाठी

या गाठी सहसा मध्यम वयात येतात. त्या आकाराने हळूहळू वाढतात. स्तनामध्ये ही गाठ बोटाने/ हाताने धरण्याचा प्रयत्न केल्यास ती पकडता येत नाही, हातातून सटकते. पण ही साधी गाठ आहे, की कर्करोगाची आहे हे ठरवणे अवघड असते. त्यासाठी ताबडतोब तज्ज्ञाचा सल्ला घेणं केव्हाही चांगले कारण स्तनाच्या कर्करोगाचे निदान उशिरा झाले तर पुढे उपचारमध्ये काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

     २) दुधाच्या गाठी आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या

स्तनाग्रांना चिरा पडणे आणि दुखणे यामुळे त्या बाजूने बाळांना पाजणे टाळतात. पाजले जाते. आणि त्यामुळे दुधाची गाठ बनू शकते आणि त्यात इन्फेक्शन होऊ शकते . किंवा कधीकधी एखाद्या स्तनातले किंवा स्तनाच्या भागातले दूध बाहेर न पडता आतच राहते. इथे आधी दुधाची गाठ तयार होते. या दुधाच्या गाठी सुरुवातीला मऊ असतात,पण चार-पाच तासांतच फुगून घट्ट होतात. दुधाची गाठ असून स्तन पिळून दूध काढले नाही तर दुधाची गाठ होऊ शकते आणि त्यात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

एकदा इन्फेक्शन झाले, की त्या बाजूचा स्तन आकाराने मोठा व कडक होतो. या स्तनावर गरमपणा व दुखरेपणा आढळतो. दोन-तीन दिवसांत गळवावरची त्वचा ताणली जाते आणि आतल्या पुवामुळे तिथे पांढरटपणा दिसतो, जर गळू आत खोलवर असेल तर मात्र असा पांढरटपणा कदाचित आढळणार नाही.

कर्करोगाची गाठ /लक्षणे

 न दुखणारी छोटी गाठ किंवा गोळ्याने स्तन कर्करोगाची सुरुवात होते. नंतर स्तनांमध्ये दुखरेपणा आणि स्तनाग्रामधून होणार रक्तमिश्रित. तसचे जर स्तनाग्रे आत ओढली गेली असतील किंवा आत ओढल्यासारखी वाटत असतील किंवा काखेमध्ये गाठी असतील तर मात्र कर्करोग वाढल्याची खूण आहे.

कमीत-कमी महिन्यातून एकदा तरी याबाबत घरगुती हाताने तपासणी करणे आवश्यक असते. अश्यावेळी गाठ जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच वयाच्या ४०शी नंतर आता हे वय ३५ पर्यंत येऊन पोहचेल आहे, नियमितपणे मेमोग्राफ करावा.

तसेच गाठ जाणवल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही प्रत्येक गाठ किंवा गोळा कर्करोग नसतो. त्यामुळे योग्यवेळी तपासणी करून खात्री करून घेणे आवश्यक असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon