Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

स्तनांबाबत काही अविश्वसनीय गोष्टी

स्तन ही निर्विवादपणे महिलांच्या शरीरातील सर्वात आश्चर्यकारक भाग आहे. ते स्त्रियांची शरीरयष्टी सुडौल बनवतात तसेच बाळाला स्तनपान देतात.किशोर वयानंतर स्तनांचे पुष्ट होणे हे मुलीचे तारुण्यातील पदार्पण दर्शवते. शरीर विज्ञानाचा विचार करता मुलांना दूध म्हणजेच सकस आहार पुरवणे हे स्तनांचे कार्य आहे. परंतु मुलांना स्तनपान देणे या पेक्षादेखील काही अविश्वसनीय गोष्टीं स्तनांच्या बाबत आढळून येतात त्या कोणत्या ते जाणून घेऊ

१.समागमतील भावनोत्कटता (Orgasm)

विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. स्तन हे स्त्रीच्या समागमाच्या संवेदनशील भाग इतकेच संवेदनशील असतात (clitoris). मोठ्या प्रमाणात स्त्रियांनाने असे सांगितले आहे की स्तनाच्या उत्तेजनेमुळे त्या समागमाच्या उत्कटते पर्यंत पोहचतात. म्हणजेच समागम दरम्यान स्त्रियांसाठी स्तनांचे उत्तजेन महत्वाचे असते.

२. स्तनांचे आकार

स्त्रियांना असे वाटत असते आपले दोन्ही स्तन सारखे दिसताना आणि सारख्याच आकारमानाचे आहे. परंतु हे चुकीचे आहे तुम्हांला या गोष्टीची जाणीव नसेल पण तुमचे दोन्ही स्तन एका सारखे नसून किंचित आकाराने लहान मोठे असतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अँड क्लोथिंगच्या प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की बहुतांश स्त्रियांचा डावा स्तन हे उजव्या स्तनांपेक्षा आकाराने मोठा असते.

३. गरोदरपणातील धूम्रपान हे स्तनावर परिणाम घडवून आणते

गरोदरपणात स्तनांचा आकार वाढतो. अश्या वेळी इलस्टिन,म्हणून ओळखले जाणारे एक महत्वाचे प्रथिने आपल्या स्तनांना कोणत्याही समस्येशिवाय लवचिकता देते. या प्रथिनांच्या कामत अडथळा आणण्याचे काम धूम्रपान करते.

४.स्तनांचा आकार सतत बदलत असतो

तुम्हांला जर असं वाटत असेल की तुमच्या स्तनांचा आकार कायम सारखाच राहील तर ते चुकीचे आहे. तुमच्या स्तनांचा आकार तुमच्या लक्षात येणार नाही अश्या पद्धतीने बदलत असतो. मासिकपाळी जवळ आल्यावर मासिकपाळीच्या दरम्यान,इतर दिवसात स्तनांचा आकार बदलत असतो तसेच संप्रेरकांच्या बदलामुळे देखील स्तनांचा आकार बदल असतो. पण हा फरक जाणवत देखील नाही. कधी-कधी हा बदल तात्पुरता देखील असतो.

५. स्तनाग्रांचा आकार

फक्त स्तनंच वेगवेगळ्या आकाराचे असतात असे नाही तर स्तनाग्रे देखील वेगवेगळ्या आकाराची असतात. एक स्तनाग्र थोडं सपाट असेल तर दुसरं एकदम उभार असेल. किंवा आत वळलेले असेल . यामुळे तुमच्या अंतर्वस्त्रच्या साईज वर काही फरक पडत नाही

६.मनुष्यप्राणी आणि स्तन

२सस्तन प्राण्यांपैकी मनुष्यप्राणी (मुख्यत्वे स्त्रियां ) हा एकाच असा प्राणी आहे ज्याचे स्तन नेहमी शरीररावर दिसतात आणि ते पुष्ट असतात. काही सस्तन प्राण्यांमध्ये स्तन हे ज्यावेळी प्राण्यांची मादीची गर्भधारणा होते किंवा पिल्लाला जन्म द्यायची वेळ येते त्यावेळी स्तन पुष्ट होतात किंवा पिल्लाच्या जन्मानंतर पिल्लू दूध पीत असतं तो पर्यंतच ते पुष्ट असतात.

स्तनांचा आकार कसाही असला तरी न्यूनगंड बाळगण्याची काही गरज नाही, किंवा वाईट वाटून घेण्याची गरज नाही. तुमचे स्तन हे खूप महत्वाचे काम बजावत असतात ते म्हणजे तुमच्या बाळाला स्तनपानाचे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon