Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

स्तनाग्रांवर गाठी किंवा स्तनाग्रांचा कडकपणा धोकादायक ?

महिलांनी आपल्या शरीराकडे तसेच आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे यासाठी त्यांना शिक्षित केले जात आहे. स्तनाग्रांवर गाठी किंवा कडकपणा आल्याचे लक्षात आले तर त्या कर्करोगाच्या किंवा इतर कोणत्यातरी आजाराच्या गाठी असू शकतात. स्तनांवर अशा प्रकारच्या गाठी किंवा काही वेगळे दिसल्यानंतर बहुतेकींना त्याविषयी काय करावे हेच कळत नाही. किंवा ते सर्वसामान्य आहे का किंवा त्वरीत वैद्यकीय सल्ला घेण्याची जरुर आहे का हे देखील समजून येत नाही. स्तनाग्रांवर किंवा स्तनांवर अशा गाठी येण्याची विविध कारणे असू शकतात ती कोणती आणि त्या गाठी अपायकारक असतात किंवा नाही

१) ब्रेस्ट बड्स किंवा स्तनांची वाढ

स्तनांची वाढ होणे ही मुलगी वयात येण्याचे पहिले लक्षण असते. स्तनाग्रांच्या आत मांसल भागाचा विकास होतो. हा मांसल भाग किंवा गाठ याला ब्रेस्ट बडस म्हणतात आणि ही वाढ सर्वसाधारण असते. व्यक्तीपरत्वे याता काही वेगळेपणा असू शकतो जसे काहींमध्यी एकाच बाजूच्या स्तनाग्रांत ही गाठ निर्माण होते. तसेच व्यक्तिपरत्वे हे बदल ९ ते १० या वयात दिसू लागतात. त्याशिवाय तिथे वेदनाही जाणवतात पण त्याविषयी काळजी करण्यासारखे फार काही नाही. वयाच्या ६ किंवा ७ व्या वर्षी स्तनांची वाढ दिसून लागली तर मात्र ते मूल अकाली वयात आले असे म्हणावे लागेल.

२) मॉन्टेगोमेरी ट्युबरकल्स

या एक प्रकारच्या लहान तैलग्रंथी आहेत ज्या स्तनांग्रांच्या जवळच्या काळसर भागात असतात. जेव्हा आई स्तनपान करत असते तेव्हा या ग्रंथी तेल स्रवतात जेणेकरून स्तनांना वंगण मिळावे. गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीपासून स्तनाग्रांच्या जवळील हा काळा भाग अधिक मोठा आणि काळा होत जातो, आणि मॉन्टेगोमरी ट्युबरकल्स ठळकपणे दिसू लागतात. स्तनाग्रांच्या काळ्या भागाजवळ पांढऱ्या रंगाच्या या छोट्या छोट्या ग्रंथी दिसतात. हा विकास सर्वसाधारण असतो आणि बाळाच्या जन्माआधी आपल्या शरीराचा हा विकास होत असतो.

टीप- स्तनांमध्ये गाठींची निर्मिती होण्याची ही दोन कारणे अगदीच सर्वसामान्य आणि नैसर्गिक आहेत. त्याविषयी काळजी करण्यासारखे काहीही नाही. आता कोणत्या वैद्यकीय परिस्थितीत स्तनांवर गाठी येऊ शकतात ते पाहूया. या गाठींकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि त्वरीत वैद्यकीय सल्ला घेण्याचीही जरुरी असते.

३) दुधाच्या गाठी

काही वेळा स्तनपान करणाèया स्त्रीचे दूध काही अडथळ्यांमुळे स्तनात राहते आणि मग त्याच्या गाठी तयार होतात. जिथे दूध अडकते तिथे डाग पडतात किंवा मऊसर गाठी विकसित होतात. गाठ आलेल्या जागी उष्ण वाटणे, वेदना होणे आणि ती जागा लालसर होणे तसेच त्वचेजवळ गाठ जाणवणे ही लक्षणे दिसतात.

४) स्तनदाह 

यामध्ये स्तनांना वेदना होतात आणि सूजही येते. स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ही अवस्था दिसून येते आणि त्याला बाळंतपणातील स्तनांचा दाह किंवा ताप (प्युअरेपेरल)असे म्हणतात. स्तनांमध्ये दुधाच्या गाठी झाल्या की हा त्रास होतो. अन्यथा त्याला पेरिडक्टल स्तनदाह म्हणतात. हा दाह स्तनांग्राच्या छिद्गांमुळे होतो किंवा त्वचेला भेगा पडल्यास होतो. याच्या लक्षणांमध्ये लालसरपणा सह गाठी होणे, स्तनाला सूज येणे, वेदना आणि स्तनांमधून रक्तमिश्रित स्राव येणे असे त्रास होतात.

५) स्तनांच्या गाठी

ही एक हलणारी अंडाकृती किंवा गोलाकार अशी पाण्याने भरलेली गाठ असते. या गाठींमुळे वेदना होऊ शकतात आणि संप्रेरकांमध्ये बदल झाल्यास त्या अधिक मोठ्या आणि वेदनादायी होतात. ह्या गाठीत पाण्याऐवजी तेल किंवा चरबीही असू शकते मात्र त्या वेदनादायी नसतात. या गाठींचा त्रास होत नाही पण तरीही अशी गाठ आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

६) स्तनांचा कर्करोग
 

स्तनामध्ये कुठल्याही भागात गाठ आल्यास तिची कर्करोगासाठी तपासणी करावी. टणक आणि स्पष्टपणे स्पर्श होऊ शकणारी आणि जागा न बदलणारी गाठ ही कर्करोगाची असल्याचे लक्षण असते. स्तनाग्रांतून स्राव बाहेर पडणे, त्वचेचा रंग आणि जाडी बदलणे किंवा डिम्पqलग ऑफ स्कीन आणि स्तनाग्रे खेचल्या सारखे होणे ही कर्करोगाची इतर लक्षणे आहेत. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon