Link copied!
Sign in / Sign up
28
Shares

स्तनपानाच्या काही समस्यांवर साधे व घरगुती उपाय


स्तनपान हा आई होण्याच्या प्रवासात खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्यामध्ये बाळाचे पोट भरेल इतकेच त्याचे महत्व नाहीये तर आईच्या व बाळाच्या नात्यात स्तनपानाने बंध तयार होत असते. स्तनपानामुळे आई ही मुलांबाबत खपच इमोशनल आणि हळवी होते. पण बऱ्याच आईंना स्तनपानात काही समस्या येत असतात जसे की, स्तन दुखणे, स्तनात पु येणे, काही वेळेला नुसता स्तनाला हात जरी लावला तर खूप दुखतो, बाळ काही वेळेला चावतो त्यामुळे सुद्धा वेदना किंवा जखम होऊन जाते. म्हणजे आईला किती गोष्टीतून सामोरे जावे लागते.

१) गरम कापडाची घडी

ह्यावर तुम्ही गरम कापडाची घडीचा वापर करू शकता. ज्यावेळी तुमचे स्तन दुखत असतील तेव्हा त्यावेळी गरम कापडाची घडी दुखऱ्या स्तनांवर लावत जा. स्तन क्रॅक असतील किंवा कडक झाले असतील, त्यांच्यात ड्रायनेस आला असेल त्यावेळी तुम्ही गरम कापडाची घडीचा वापर करा तुम्हाला आराम मिळेल. ह्यातून स्तनपानालाही अडथळा येणार नाही. त्याबरोबरच कापड हे गरम पाण्यात चांगले धुवून घ्यायचे. गरम घडी ही जेव्हा बाळ झोपलेले असेल तेव्हा ठेवा आणि दर थोड्या वेळानंतर असे करत चला. जेणेकरून स्तनांचा दुखरेपणा जाऊन बाळाला व्यवस्थित स्तनपान करता येईल.

२) स्तनपानाचे दूध स्तनांना लावावे

स्तनपानाच्या दुधात अँटीबॅक्टरीयल गूण असतात. त्यामुळे रात्री किंवा बाळाला दूध पाजल्यानंतर थोडे दूध हातात घेऊन ते स्तनांना आणि निप्पल्स ला लावून घेत चला ह्यामुळे दुधातली अँटीबॅक्टरीयल घटक त्या जखमेला आणि दुखऱ्या स्तनाला आराम देतील. हे मेडिसिन नैसर्गिक आणि खूपच परिणामकारक असते. त्यामुळे न चुकता हा सोपा घरगुती उपाय करावा.

३) साबण

जर तुम्ही स्तनपान करत आहात. आणि तुम्हाला वाटले की, मला स्वच्छता करायची आहे आणि अंघोळ सुद्धा करावीशी वाटेल त्यावेळी लक्षात घ्या की, तुम्ही स्तनपानाची जागा पुसून घेतली तरी चालेल. किंवा खूप काही घाण वास येत नसेल तर अंघोळ करू नका. आणि अंघोळ करत असाल तर स्तनांची जागेला साबण लावू नका. बिलकुल लावू नका. पाणी टाकून घ्या वाटल्यास. कारण स्तनपानामुळे तुमच्या त्वचेवर खूप काही बदल घडत असतात आणि त्यात साबणाच्या केमिकलमुळे आणखी त्यात रिअक्शन होऊ शकते. बऱ्याचदा ह्या साध्या व लहान गोष्टी असतात पण ह्यामुळे बाळाला कधी उपवास घडू शकतो म्हणून लक्षात घ्या.

४) खूप सारी प्रोडक्ट ला दूरच ठेवा

कोणतंही बेबी प्रोडक्टस हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊच नये. आणि ह्याबाबत उतावीळपणा कमीच करावा नाहीतर नवीन झालेली पालक ही खूपच उत्साहित होतात. आणि नको ते करायला लागतात. क्रीम्स, लोशन, आणि इतर उत्पादने बऱ्याचदा बाळाला ऍलर्जिक रिअक्शन करू शकतात. कारण काही काही बाळाची स्किन ही खूपच संवेदनशील असते. काही नैसर्गिक प्रोडक्टस ही त्वचेला कोरडी करून टाकतात. म्हणून कमीच लावा. व बाळाची त्वचा ही तशीच राहू द्या.

५) खोबरेल तेल आई ऑलिव्ह ऑइल

खोबरेल तेल आणि ऑलिव्ह तेल हे खूपच सुरक्षित असते. आपल्या घरात प्रत्येक आईच्या सासूला व आईला माहिती आहे की, बाळाची खोबरेल तेल ने मालिश कशी करायची. आणि ह्यात आई नेही तिच्या स्तनांना आणि निपल्स ला खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेलाने मालिश करून घ्यायची. ह्यामुळे त्वचा ही मुलायम तर होतेच पण त्वचा किंवा निप्पल्स क्रॅक होणे अशी समस्या येत नाही. आणि आली असेल तर त्यावर उपचारासाठी योग्य आहे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon