Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

स्तनांच्या भागात होणाऱ्या फंगल इन्फेक्शन बद्दल तुम्हांला माहिती आहे का ?

      स्तनांच्या खालच्या भागत  फंगल म्हणजेच बुरशीजन्य संसर्गची समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसेच स्तनाचा आसपास देखील विविध करणांनी संसर्ग होण्याची शक्यता असते.  या भागात अश्या प्रकारचे इन्फेक्शन निर्माण होण्याची अनेक कारणे असु शकतात. अश्या प्रकारची अनेक त्वचेसंबंधित इन्फेक्शनकडे बऱ्याचदा  दुर्लक्ष होते. अश्याच इन्फेक्शनचे नंतर  स्वरूप मोठे झाल्यावर उपचार करणे अवघड आणि वेळखाऊ होते. काही वेळा या प्रकारची इन्फेक्शन स्तन आणि त्याच्या वरील भागात पोहचण्याची शक्यता असते. अश्याप्रकाची इन्फेक्शन कश्यामुळे होतात आणि त्याची कळून येणारी काही लक्षणे कोणती हे आपण पाहणार आहोत.

स्तनांना होणारे विविध बुरशीजन्य आणि इतर संसर्ग(इन्फेक्शन)

१. मॅसाटाइटिस  (Mastitis)प्रकारचे इन्फेक्शन

या प्रकारचे इन्फेक्शन स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये सामान्य आहे. तसेच हे स्तनपान न देणाऱ्या स्त्रियांना देखील होऊ शकते. स्तनाग्रांवर पडणाऱ्या लहान चिरांवर वेळेत उपचार न करणे हे  या  प्रकारचे संसर्गसाठी आमंत्रणच असते. या प्रकारचे इन्फेक्शन हे फार त्रासदायक असते. यामध्ये स्तनांना दाह होते. तसेच स्तनाचा काही भाग लाल दिसतो तसेच तो भाग जरा गरम जाणवतो. कधी-कधी थोडी सूज देखील येते.

२. एक्जिमा (Eczema) (इसब )

एक्जिमा म्हणजे इसब आणि गजकर्ण यात त्वचा लालसर होते, काळवंडते आणि खूप खाज सुटते. हे इन्फेक्शन देखील बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, स्वच्छतेसाठी कमी पाण्याचा वापर होय. हे इन्फेक्शन वेगाने पसरते. पण  औषधे घेऊन, योग्य प्रकारे स्वच्छता बाळगल्याने हा संसर्ग लवकर बरा होऊ शकतो.

३. कँडिडासीस संसर्ग (Candidiasis) (इन्फेक्शन)

कॅडिडा बुरशीमुळे होणाऱ्या  संसर्गमुळे त्वचा मऊ होते, स्तनांची झीज, स्तन मऊ होणं किंवा सुजणे, त्वचेला खाज येणं, झिणझिण्या येणं, जळजळणं, टोचणं, खुपणं किंवा मुंग्या आल्यासारखं वाटतं. यामध्ये साधारणतः या प्रकारच्या संसर्गात काही अँटी फंगल क्रीम आणि लोशन वापरण्याचा सल्ला देण्यात येतो.

४. अति घामामुळे होणारे इन्फेक्शन ( Hyperhidrosis)

शरीराला आवश्यक असणाऱ्या घामापेक्षा अति घामामुळे देखील स्तनाना आणि आसपासच्या भागात बुरशीजन्य संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते.

ही लक्षणे दर्शवतात तुमच्या स्तनांना फंगल इन्फेक्शन झाले आहे

१.स्तन आणि त्याच्या आसपासच्या भागात आग होणे आणि खाज येणे. विशेषतः स्तनाचा खालच्या भागात खाज आणि आणि आग होते.

२. स्तनाची किंवा आसपासची त्वचा सोलवटणे आणि आग होणे.

३. स्तनाच्या खालची त्वचा लाल होणे, काळवंडणे.

४. बाळाला पाजल्यानंतर आग होणे दुखणे.

५. स्तनाग्रांना खाज येणे आणि त्वचा लालसर होणे.

६. स्तनाग्रांना छोट्या चिरा पडणे.

७. स्तनांच्या आसपास दुर्गंधी येणे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
100%
What?
scroll up icon