Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

स्तनांच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक उपाय

 

महिलांना होणाऱ्या कर्करोगांपैकी  ३०% रुग्ण स्तनांच्या कर्करोगाचे असतात हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते कारणबहुतेक रुग्णांच्या बाबतीत हे सर्व अचानक उद्भवते आणि हा कर्करोग जर प्राथमिक अवस्थेत नसेल तर पूर्णपणे बारा होणे अवघड असते.स्तनांच्या कर्करोगापासून पूर्णपणे बचाव करण्याचा कोणताही खात्रीशीर उपाय नसला तरीही काही गोष्टींचा अवलंब करून तुम्ही हा आजार होण्याची शक्यता कमी नक्कीच करू शकता. बघूया हे ५ मार्ग ज्यांनी तुम्ही स्तनांच्या कर्करोगापासून स्वतःचा बचाव करू शकता.  

१] तुमच्या वजनावर लक्ष ठेवा

स्त्रिया जर लठ्ठ असतील किंवा अतिवजनच्या असतील तर त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. खास करून रजोनिवृत्तीनंतर वजन योग्य प्रमाणात राखले गेले नाही तर गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात आणि स्तनांचा कर्करोग हा त्यांपैकीच एक आहे.वजन लवकर कमी करण्यासाठी उपाशी राहून डाएट करणे किंवा खूप जास्त व्यायाम करण्याचा सल्ला मुळीच दिला जात नाही. याउलट, ठरवलेले वजन कमी करण्यासाठी हळू हळू प्रयत्न सुरु करा अगदी आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करण्यापासून सुरुवात करू शकता.

२] शारीरिकदृष्ट्या सक्रिय बना

योग,चालणे ,व्यायाम किंवा जॉगिंग या पैकी तुम्हाला योग्य वाटणारा कोणताही  मार्ग निवडा आणि शारीरिक हालचाल वाढावा कारण कर्करोगापासून बचाव करण्यासाठी या उपायांचा अवलंब करूनच तुम्ही वजन आटोक्यात ठेवू शकता. दिवसभरात किमान ३० मिनीटांची सक्रिय शारीरिक हालचाल करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार,दिवसभरात ३ तासांपेक्षा कमी वेळ बसून राहणाऱ्या महिलांच्या तुलनेत ६ किंवा त्यापेक्षा अधिक तास बसून राहणाऱ्या महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका १०% ने अधिक असतो.

३] आरोग्यपूर्ण आहार

आहार पोषक असावा असे वारंवार सांगितले जाते कारण शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व खनिज द्रव आणि पोषक घटकांनी पूर्ण आहार घेण्याने तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. ताज्या भाज्या आणि फळे खाण्याने पोट भरलेले राहील आणि शरीरासाठीही उत्तम!

दररोज ८-१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न नक्की करा.

४] मद्यपान आणि धूम्रपान टाळा

आरोग्यासाठी दारू पिणे आणि सिगारेट नक्कीच चांगले नाही आणि स्तनांच्या कर्करोगाला हि हेच लागू होते.दिवसभरात २ ते ४ ग्लासापेक्षा अधिक दारू पिल्यास स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो आणि तुमच्या कुटुंबात या कर्करोगाचा रुग्ण असेल तर मद्यसेवन ठराविक प्रमाणात करणेच योग्य ठरेल.

५] स्तनपान

संशोधनात असे आढळून आले आहे कि,स्तनपान करवण्याने स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो खासकरून एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधी साठी स्तनपान करावल्यास. म्हणजेच हा काळ जेवढा जास्त असेल तेवढे तुमचे या आजारापासून जास्त रक्षण होईल.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon