Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

श्रीदेवीचा मृत्यू तिच्या सुंदर दिसण्याच्या प्रयत्नामुळे झाला का?

           हिंदी चित्रपट सिने अभिनेत्री श्री देवीचे अकस्मात जाणे चटका लावून गेले. तिचे वय खूप नव्हतेच. आणि तिचे चित्रपट सुद्धा येणार होते. आणि तिने मागच्याच वर्षी मॉम आणि त्या आधी गोडबोले म्हणून इंग्लिश - विंग्लिश मध्ये मराठी कॅरेक्टरची भूमिका केली होती. आणि ती न्यूजमध्ये व ट्रेंडिंग मध्ये असणारी अभिनेत्री होती. आणि अचानक तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. असे तुम्ही ऐकले असेल किंवा बरेच व्यक्ती हेच समजत आहेत. पण तिचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला. त्या दुबईला गेल्या असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना अचानक कार्डिअॅक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला.

अनेकांना ह्याबाबत खूपच धक्का बसला. अमिताभ ह्यांनी ह्याविषयी ट्विट केलेच होते. पण तुम्हाला माहिती आहे का ? की श्रीदेवीचा अकस्मात जीव का गेला? त्या विषयी काही गोष्टी सांगणारा हा ब्लॉग.

१) श्रीदेवी हीचा जन्म तामिळनाडू मधील शिवकाशी ह्या जिल्हात झाला होता. श्री देवी ही सुद्धा सावळी, ओठ जाड आणि नाकही बसकेच होते. जर तुम्ही तिचे खूप जुने फोटो पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की, ती आज जशी दिसतेय तशी ती नव्हती. उलट ते सौंदर्य खूप सुंदर होते.

२) पण जेव्हा ती हिंदी चित्रपटात कामाला आली तेव्हा तिला ह्या हिंदी चित्रपट सृष्टीने जाणीव करून दिली की, तुझ्या चेहऱयावर गोरेपणा, ओठ खूप मुलायम, आणि त्वचा ही रसरशीत असायला हवी. तेव्हाच तू इथे टिकशील. ही गोष्ट हिंदी चित्रपटात असायलाच हवी. आणि ह्याच गोष्टीचा नाद तिला जडला. कारण ह्यासाठी तिने त्यावेळी खूप प्रयास करून स्वतःचे सौन्दर्य गोरेपणात अडकवून ठेवले. आणि तेव्हापासून खूप मेकअप करणे आणि चेहऱ्याला सूट होणार नाहीत अश्या शस्त्रक्रिया करणे हे चालू झाले. आणि ज्यावेळी तिने ४५ वय ओलांडले तेव्हा तिच्या चेहऱयावर वयानुसार सुरकुत्या पडल्यात. आणि त्यावेळी ती आणखी ह्या सुरकुत्या घालवण्यासाठी पुन्हा एकदा त्याच प्लास्टिक सर्जरींचा चक्रव्यूहात अडकली, चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसू नये म्हणून दर वेळी केलं जाणारं विखारी प्रोसिजर असा संपूर्ण चेहऱ्याचा, संपूर्ण शरीराचा कायापालट पन्नाशी ओलांडलेल्या शरीराला झेपत नव्हतेच.

३) वजन कमी करण्यासाठी गोळ्या खाणे, किंवा औषधे घेणे त्याचबरोबर चुकीच्या डायट गुरूकडून चुकीचे डायट घेणे ह्यामुळे तिचे शरीरावर उलटाच परिणाम होत होता.

४) स्त्रीने सुंदर दिसायलाच हवे पण त्यासाठी स्वतःच्या शरीरावर काहीही प्रयोग करणे व खूप सर्जरी करणे चुकीचे आहेच. तिचा मृत्यू ह्यामुळेच झाला असे आपण सांगू शकत नाहीत पण ह्या सर्व गोष्टीचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम होत होता. आणि लोकांनी सतत आपल्या सौन्दर्याची स्तुती करायला हवी आणि त्यासाठी काहीही करणे चुकीचे आहेच.

५) सुंदर दिसण्यासाठी मर्यादित आणि सोसेल तितकेच करावे. नाहीतर त्याच दबाव तुमच्यावर पडायला लागतो आणि खूप साऱ्या अभिनेत्रींना ह्या दबावाला बळी पडावे लागते. म्हणून सतत सुंदर दिसण्याची सवय करून घेऊ नका.

६) तिचे अगोदरचे फोटो आणि हिंदी चित्रपटात आल्यानंतरचे फोटो तुम्ही पाहू शकतात. त्यात तुम्हाला उत्तर मिळेल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon